जाणून घ्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत वाहनांबद्दल

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. या निमित्ताने त्यांच्या वाहनांची आणि सुरक्षेची विशेष चर्चा सुरू आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था ही आपल्या राष्ट्रपतींच्या सुरक्षेप्रती नेहमी जागृक असते. यामुळेच अमेरिकन राष्ट्रपतीच्या प्रत्येक वाहनांच्या नावासमोर ‘वन’ हा शब्द जोडलेला असतो. याशिवाय राष्ट्रपती देशाचे प्रथम नागरिक असल्याने त्यांच्या वाहनांच्या नावापुढे ‘वन’ हा शब्द असतो. ट्रम्प यांच्या अधिकृत वाहनांबाबत जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

एअरफोर्स वन –

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्या विमानातून प्रवास करतात, त्याचे नाव ‘एअरफोर्स वन’ असे आहे. हे एक बोईंग 747-200बी सीरिज एअरलाइनरचे मिलिट्री व्हर्जन बोईंग व्हीसी-25ए आहे. या विमानात हवेत इंधन भरण्याची क्षमता असते. यात एक डॉक्टर कायम उपस्थित असतो. विमानात मेडिकल सूट, तीन स्तरांवर 4 हजार वर्गफूट जागा, दोन किचन अशा अनेक गोष्टींची सोय आहे.

Image Credited – Amarujala

कॅडेलिक वन –

अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत कारचे नाव ‘द बीस्ट’ आहे. ट्रकच्या चेसिसवर बनलेल्या या कारचे वजन 6,400 किलो आहे. यात सुरक्षेसाठी अत्याधुनिक सर्व उपकरणे आहेत.

Image Credited – Amarujala

ग्राउंड फोर्स-वन –

अमेरिकन राष्ट्रपतींच्या बसचे बिगर अधिकृत नाव ‘ग्राउंड फोर्स वन’ आहे. या ग्राउंड फोर्स वनची लांबी 45 फूट आहे. अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसने ही बस तयार केली आहे. अमेरिकच्या सिक्रेट सर्व्हिसने या बसला टेनेसी येथील एका कंपनीकडून 1.1 मिलियन डॉलरमध्ये (जवळपास 7.1 कोटी रुपय) खरेदी केले होते. बसचे टायर आतून मेटलचे आहेत व वरती रबर आहे. ज्यामुळे टायरला काही झाल्यानंतरही बस सहज चालू शकते. बस आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहे व याचे ग्लास देखील बुलेटप्रुफ आहेत.

Image Credited – Amarujala

मरीन वन –

अमेरिकेचे राष्ट्रपती व्हाइट हाऊसवरून मॅरीलंड येथील अँड्र्यूज एअरफोर्सवर जाण्यासाठी ‘मरीन वन’ हेलिकॉप्टरचा वापर करतात. आंतरराष्ट्रीय दौऱ्या दरम्यान देखील याचा वापर होतो. या हेलिकॉप्टरचा अधिकतम वेग ताशी 241 किमी आहे. व्हीएच-92 कॉप्टरला लॉकहिट मार्टिंनची कंपनी सिकोरस्काईने बनवले आहे. या हॅलिकॉप्टरमध्ये बाथरूम देखील आहे. कॅडेलिक वन प्रमाणेच याला देखील सी-17 ग्लोबमास्टर आणि सी-5 गॅलेक्सी सारखी ताकदवर  प्लेनने ट्रांसपोर्ट करता येते.

Image Credited – Amarujala

नेव्ही वन –

‘नेव्ही वन’ हे अमेरिकच्या राष्ट्रपतींचे एक नेव्ही एअरक्राफ्ट आहे. एस-3 वायकिंग एअरक्राफ्टला देखील लॉकहीड मार्टिनने बनवले आहे. हे एक प्रकारचे अँटी सबमरीन वॉरफेअर एअरक्राफ्ट आहे. या एअरक्राफ्टचे वैशिष्ट्य म्हणजे हे रात्री व दिवसा अशा दोन्ही वेळीस उड्डाण घेऊ शकते.

Leave a Comment