चुकीच्या इंग्रजीमुळे पुन्हा ट्रोल झाला पाक क्रिकेटपूट

पाकिस्तानी क्रिकेटपटू इंग्रजी येत नसल्यामुळे अनेकदा ट्रोल झाले आहेत. सध्या पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल देखील आपल्या चुकीच्या इंग्रजीमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

अकमलने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाकसोबतच एक फोटो शेअर करताना लिहिलेल्या चुकीच्या कॅप्शनमुळे त्याची खिल्ली उडवली जात आहे. अकमलने फोटो शेअर करताना लिहिले की, दुसऱ्या भावापासून आई (Mother from another brother).

Image Credited – NDTV

याच चुकीच्या इंग्रजीमुळे अकमलची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात असून, काहीवेळातच त्याला पोस्ट डिलीट करावी लागली. मात्र त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले. नेटकऱ्यांनी एवढी खिल्ली उडवली की ट्विटरवर #UmarAkmalQuotes ट्रेंड होऊ लागले.

https://twitter.com/ImshivankTyagi/status/1230400750750072832

अनेक युजर्सनी अकमलची खिल्ली उडवणारे मिम्स देखील शेअर केले. याआधी देखील आपल्या चुकीच्या इंग्रजीमुळे अकमल सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.

Leave a Comment