कैलास पर्वताबाबत जाणून घ्या रहस्यमयी गोष्टी

हिंदू धर्मात कैलास पर्वताला विशेष महत्त्व आहे. कारण या जागेला भगवान शंकरांचे निवासस्थान मानले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात उंच पर्वत असलेल्या माउंट एव्हरेस्टवर आतापर्यंत 7 हजार पेक्षा अधिक जण जाऊन आले आहेत. मात्र माउंट एव्हरेस्टपेक्षा 2000 मीटर कमी उंची असलेला कैलास पर्वत (6638 मीटर) आजपर्यंत कोणीही सर करू शकलेले नाही.

पृथ्वीचे एक टोक उत्तर ध्रुव तर दुसरे दक्षिण ध्रुव आहे. या दोन्हींच्या मध्यभागी हिमालय आहे. कैलास पर्वत हिमालयाचे केंद्र आहे. वैज्ञानिकांनुसार हे पृथ्वीचे केंद्र आहे. कैलास पर्वत हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख या धर्मांचे देखील केंद्र आहे.

Image Credited – Amarujala

कैलास पर्वत आतापर्यंत कोणीच सर करू शकले नाही, याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. काही जणांचे म्हणणे आहे की, या ठिकाणी आजही भगवान शंकर राहतात. त्यामुळे जिवित व्यक्ती येथे जाऊ शकत नाही. मेल्यानंतर अथवा ज्याने कोणतेही पाप केलेले नाही, तिच व्यक्ती कैलास पर्वत सर करू शकते.

असेही म्हटले जाते की, कैलास पर्वत चढण्यास सुरूवात करताच व्यक्ती दिशाहीन होतो. विना दिशेचे चढाई करणे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असल्याने आजपर्यंत कोणीही यावर चढू शकले नाही.

Image Credited – Amarujala

वैज्ञानिक दृष्टीकोनाने या पर्वताच कोन 65 डिग्री आहे. तर माउंट एव्हरेस्टचा कोन 40 ते 60 डिग्री आहे. यामुळे याची चढाई अधिक अवघड होते.

Image Credited – Amarujala

दावा करण्यात येतो की कैलास पर्वतावर अनेकवेळी 7 प्रकारच्या लाईटी चमकताना दिसतात. नासाच्या वैज्ञानिकांचा दावा आहे की असे चुंबकीय शक्तीमुळे होते.

Leave a Comment