‘कट-कॉपी-पेस्ट’ कमांडचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकाचे निधन

कट, कॉपी आणि पेस्ट या तीन कमांडमुळे कॉम्प्युटर आणि सोशल मीडियावरील अनेक कामे सोपी होतात. या कमांडचा शोध लावणारे कॉम्प्युटर वैज्ञानिक लॅरी टेस्लर यांचे वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले आहे. कट, कॉपी आणि पेस्ट या यूजर इंटरफेस अर्थात यूआयला लॅरी टेस्लर यांनी तयार केले होते.

लॅरी यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. त्यांनी स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली. त्यानंतर 1973 मध्ये त्यांनी झेरॉक्स पॉलो आल्टो रिसर्च सेंटरमध्ये नोकरी करण्यास सुरूवात केली. येथूनच कट, कॉपी आणि पेस्ट यूजर इंटरफेसची सुरुवात झाली.

टेस्लर यांनी याच रिसर्च सेंटरमध्ये टिम मॉट सोबत मिळून जिप्सी टेक्स्ट एडिटर तयार केला. या जिप्सी टेक्स्ट एडिटरमध्ये त्यांनी शब्दांना कॉपी आणि मूव्ह करण्यासाठी मोडलेस मेथड तयार केली.

लॅरी टेस्लर यांनी या रिसर्च सेंटरमध्येच कट, कॉपी आणि पेस्ट कमांडचा शोध लावला. मात्र नंतर कट, कॉपी आणि पेस्ट कमांडची कॉन्सेप्ट कॉम्प्युटर इंटरफेस आणि टेक्स्ट एडिटर्ससाठी आली.

लॅरी ज्या झेरॉक्स पॉलो आल्टो रिसर्च सेंटरमध्ये काम करायचे त्यालाच सुरुवातीच्या ग्राफिकल यूजर इंटरफेस आणि माउस नेव्हिगेशनचे क्रेडिट जाते. मात्र नंतर अ‍ॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी या रिसर्चला अ‍ॅपल डिव्हाईसला अधिक चांगले बनविण्यासाठी वापरले. लॅरी टेस्लर यांनी अ‍ॅमेझॉन आणि याहूसोबत देखील काम केले होते.

Leave a Comment