सिंगल कॅमेरा असतानाही स्मार्टफोनद्वारे असे काढा शानदार फोटो

आज फोन खरेदी करताना अनेकजण सर्वात प्रथम त्याचा कॅमेरा तपासतात. सोबतच फोनमध्ये दोनपेक्षा अधिक कॅमेरे आहे की नाही हे देखील पाहतात. स्मार्टफोनमध्ये दोनपेक्षा अधिक कॅमेरे असल्याने बोकेह इफेक्ट (फोटोग्राफीचा इफेक्ट) अथवा पोट्रेट मोडसह शानदार फोटोग्राफी करतात. मात्र काहीजण आजही सिंगल कॅमेरा फोन वापरतात. आज अशा काही ट्रिक्स जाणून घेऊया, ज्याद्वारे तुम्ही फोनमध्ये सिंगल कॅमेरा असतानाही ड्युअल कॅमेऱ्यासारखे फोटो काढू शकता.

Image Credited – Amarujala

बोकेह इफेक्ट कसे काम करते ?

ड्युअल लेंस असणारा स्मार्टफोन एकावेळी दोन फोटो क्लिक करतो व दोघांना मिळून एक फोटो देतो. या इफेक्टचा वापर डीएसएलआर कॅमेऱ्यात देखील होतो. सिंगल कॅमेऱ्यामध्ये याचा वापर कसा कराल, याविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

जर तुमच्याकडे रिअरला सिंगल कॅमेरा असणारा अँड्राईड फोन असेल तर AfterFocus नावाचे अ‍ॅप फोनमध्ये डाउनलोड करा. याद्वारे तुम्ही फोटोच्या बॅकग्राउंडला ब्लर करू शकता.

Image Credited – Amarujala

तसेच, तुम्ही DOF Simulator नावाचे अ‍ॅप देखील चांगल्या फोटोग्राफीसाठी डाउनलोड करू शकता. ज्याच्या मदतीने तुम्ही बॅकग्राउंड ब्लर असणारे फोटो काढू शकता.

Leave a Comment