लॉचिंगच्या आधीच विकल्या गेल्या होंडाच्या या स्कूटर

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या होंडा फोर्झा 300 या स्कूटरच्या 4 यूनिट्सची लाँचिंगच्या आधीच विक्री झाली आहे. कंपनीने गुरुग्राम येथील बिंगविंग शोरुममध्ये या स्कूटर्सला डिस्प्ले करण्यासाठी ठेवले होते. मात्र ही स्कूटर ग्राहकांना एवढी आवडली की, लाँचच्या आधीच कंपनीने याची विक्री केली. या सर्व 4 स्कूटर्स बीएस-4 मानक इंजिन असलेल्या होत्या. याच्या किंमतीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

कंपनी होंडा फोर्झा 300 स्कूटरला बीएस-6 इंजिनसह वर्ष 2021 मध्ये लाँच करणार आहे. यूकेमध्ये या स्कूटरची किंमत जवळपास 4.65 लाख रुपये आहे. भारतातील या स्कूटरची किंमत लाँचिंगनंतरच समजेल. मात्र याची किंमत 2.5 ते 3 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

Image Credited – NDTV

होंडा फोर्झा 300 ही कंपनीची भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये 279cc लिक्विड-कूल्ड, 4 वॉल्व, 4-स्ट्रोक, फ्यूल इंजेक्टेड SOHC इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 7000 आरपीएमवर 24.8 bhp पॉवर आणि 5750 आरपीएमवर 27.2 Nm टॉर्क जनरेट करते. यात CVT ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मिळते.

यामध्ये डिजिटल-एनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टरसोबत इलेक्ट्रिक स्क्रीन, दोन हेल्मेटच्या स्टोरेजची क्षमता मिळते.

Image Credited – zigwheels

या स्कूटरच्या फ्रंटला 15 इंच आणि रिअरला 14 इंचचे व्हिल देण्यात आलेले आहेत. यात फ्रंटला 33 मिलीमीटरचा टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि रिअरला 7 स्टेप अडजस्टेबल ट्विन रिअर शॉक अब्जॉर्बर देण्यात आलेले आहे. सोबतच यात सिंगल पीस एल्युमिनियम स्विंगआर्म देखील मिळतील.

Image Credited – bikeadvice

ब्रेकिंग फीचर्सबद्दल सांगायचे तर यात फ्रंटला 256 मिलीमीटर डिस्क ब्रेक आणि रिअरला 240 मिलीमीटरचा डिस्क ब्रेक देण्यात आलेला आहे. यात ड्यूअल चॅनेल एबीएस फीचर देखील मिळेल.

Leave a Comment