या स्वस्त प्रीपेड प्लॅन्समध्ये मिळेल दररोज 1.5 जीबी डाटा

देशातील टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवीनवीन प्लॅन घेऊन येत आहे. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांनी आपले ग्राहक वाढवण्यासाठी अनेक स्वस्त प्रीपेड प्लॅन बाजारात आणले आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना अधिक डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. असेच काही स्वस्तात मस्त प्रीपेड प्लॅनविषयी जाणून घेऊया.

जिओ (399 रुपये) –

या प्लॅनमध्ये युजर्सला 56 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डाटा आणि 100 एसएमएसची सुविधा मिळेल. सोबतच युजर्सला जिओ-टू-जिओ नेटवर्क कॉलिंग मोफत असेल व अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 2,000 एफयूपी मिनिट देण्यात येतील.

Image Credited – Amarujala

एअरटेल (248 रुपये) –

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 एसएमएस आणि सोबतच 1.5 जीबी डेटा मिळेल. याशिवाय युजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. या पॅकची वैधता 28 दिवस आहे. यामध्ये ग्राहकांना एअरटेल एक्सट्रीम, विंक म्यूझिक, हॅलो ट्यून आणि अँटी व्हायरस मोबाईल प्रोटेक्शन मोफत मिळेल.

Image Credited – Amarujala

व्होडाफोन (249 रुपये) –

या प्लॅनचा कालावधी 28 दिवस असून, यामध्ये युजर्सला दररोज 1.5 जीबी डाटा मिळेल. युजर्सला या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, व्होडाफोन प्ले आणि झी5 चे स्बस्क्रिप्शन देखील मिळेल.

Image Credited – Amarujala

एअरटेल (598 रुपये) –

या प्लॅनमध्ये देखील युजर्सला एअरटेलच्या 248 रुपयांच्या पॅकमधील सर्व सेवा मिळतील. यात दिवसाला 100 एसएमएस आणि 1.5 जीबी डाटा ग्राहकांना मिळेल. मात्र या प्लॅनचा कालावधी 84 दिवस आहे.

 

Leave a Comment