पुण्यतिथी डेडबॉडीच्या आकाराचा केक कापून साजरी


फोटो सौजन्य पत्रिका
केक हा जगातील बहुतेक सर्व लोकांच्या आवडीचा पदार्थ आहे आणि विविध समारंभ विविध प्रकारच्या खास केकसह साजरे करण्याची प्रथा आहे. केकचा सर्वात जवळच्या संबंध नाताळ सणाशी आहे. त्यानंतर लग्नाचे, वाढदिवसाचे केक असतात तसेच आता घटस्फोट साजरा कारणासाठी खास केक बनविले जातात. मात्र मृत माणसाच्या मृत्यूचा दिवस केक कापून साजरा करणाची नवी प्रथा रुळू पाहते आहे. सोशल मीडियावर या संदर्भातला एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होतो आहे. त्यात मृत माणसाची हुबेहूब प्रतिकृती असलेला केक दिसत असून तो कापून वेटर सर्व्ह करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ स्पेनचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओ अस्सल की बनावट हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण सोशल मिडियामुळे जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात घडलेली घटना काही तासात जगभर पसरविण्याची सोय काही वेळा अशी उपयोगी पडते. मृत व्यक्तीसारखा दिसणारा हा केक वेटर कापताना आणि फोटोग्राफर त्याचे फोटो काढताना त्यात दिसत आहेत. पण सुरवातीला हा केक अगदी खऱ्या डेडबॉडी सारखा दिसत असल्याने पाहणाऱ्याची जीभ भीतीने टाळ्याला चिकटली तर नवल नाही. लक्षपूर्वक पहिले तरच ही खरी डेड बॉडी नाही, केक आहे असे लक्षात येते. विशेष म्हणजे आत्तापर्यत १० लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

Leave a Comment