मोटेरा स्टेडीयमवर पूर्वी नोंदविली गेली आहेत ही रेकॉर्ड


टीम इंडियाचा दणकेबाज फलंदाज रोहित शर्मा यांनी बीसीसीआयने जगातील सर्वात मोठ्या अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमचा एरीयल व्ह्यू शेअर केल्यावर या स्टेडियमवर खेळण्यापासून तो स्वतःला अधिक रोखू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित सध्या जखमी असल्याने टीम बाहेर आहे. या स्टेडियमचे उद्घाटन अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २४ फेब्रुवारीला होत आहे.

या स्टेडियमच्या अनेक यादगार आठवणी आहेत. मुळचे स्टेडियम १९८२ मध्ये तयार झाले आणि त्यासाठी गुजराथ सरकारने ५० एकर जमीन दिली होती. येथे १९८३ ला पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळली गेली होती. आत्तापर्यंत या स्टेडियमवर १२ कसोटी आणि २४ वनडे खेळल्या गेल्या आहेत. शेवटचा सामना भारत श्रीलंका यांच्यात खेळला गेला होता त्यानंतर स्टेडियमच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले.

याच मैदानावर भारत पाक यांच्यात २०१२ मध्ये टी २० सामना झाला आणि तो भारताने जिंकला होता. त्यानंतर पाकिस्तानी संघ भारतात आला नाही. सुनील गावस्करने त्याच्या १० हजार धावा येथेच पूर्ण केल्या त्या पाकिस्तान विरुद्ध खेळताना १९८६-८७ मध्ये. याच मैदानवर श्रीलंकेविरुद्ध खेळताना कपिल देव याने रिचर्ड हॅडलीचे सर्वाधिक बळीचे रेकॉर्ड मोडले. सचिन तेंडूलकरने येथेच १९९९ मध्ये न्यूझीलंड विरुध्द खेळताना पहिली डबल सेंच्युरी काढली. याच मैदानावर सचिनने २०११ चा वर्ल्ड कप खेळताना ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात १८ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

Leave a Comment