पुतीन यांना त्यांंचा पगार विचारणारी डेरिंगबाज महिला


फोटो सौजन्य डेली मेल
रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या कडकपणाच्या, धोरणीपणाच्या, मुत्सद्देगिरीच्या आणि क्रूरतेच्या बातम्या अनेकदा वाचायला मिळतात. रशियात पुतीन याना सार्वजनिक ठिकाणी अवघड प्रश्न विचारण्याचे धाडस एका महिलेने केले. इतकेच नव्हे तर पुतीन काय उत्तर देताहेत याचा व्हिडीओ सुद्धा बनविला आहे. पुतीन त्यांच्या राजकीय गुरुना श्रद्धांजली देण्यासाठी होमटाऊन सेंट पिटसबर्ग येथे आले असताना ही घटना घडली.

ही महिला गर्दीतून एकदम पुढे आली आणि पुतीन यांना तिने विचारले, १७० डॉलर्समध्ये तुम्ही महिन्याचा घरखर्च भागवू शकता का? याला पुतीन यांनी इतक्या पैशात महिन्याचा खर्च भागविणे अवघड आहे असे उत्तर दिल्यावर ही महिला म्हणाली तुम्हाला किती पगार मिळतो? माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रपतींना ८ लाख रुबल्स मिळतात. त्यावर पुतीन म्हणाले, होय, पण यापेक्षा अधिक पगार घेणारे लोक रशियात आहेत. रशियात राष्ट्रपतीला सर्वाधिक पगार मिळत नाही.

ही महिला त्यावर म्हणाली, ती बुककीपिंगचे काम करते आणि त्याबदली तिला महिन्याला १०८०० रुबल्स म्हणजे १७० डॉलर्स मिळतात. यावर पुतीन यांनी इतक्या पैशात घरखर्च भागविणे अवघड आहे हे मान्य केले. ते म्हणाले सरकारला अनेक समस्या अजून सोडवायच्या आहेत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्यावर या महिलेला पुतीन याच्यासोबत फोटो काढू का असे विचारले त्याला पुतीन यांनी लगेच होकार दिला. पुतीन मोठ्या सभागृहात जनतेशी थेट संवाद काही वेळा साधतात पण त्यावेळी विचारण्याचे प्रश्न अगोदरच ठरलेले असतात. सर्वसामान्य रशियन महिलेने सार्वजनिक ठिकाणी पुतीन याना अवघड प्रश्न विचारण्याची घटना त्यामुळे वेगळी ठरली आहे.

Leave a Comment