दार्जिलिंगचे अनोखे शिवमंदिर


फोटो सौजन्य हिमालयन ट्रॅॅव्हल
दार्जिलिंग या थंड हवेच्या ठिकाणी सुंदर परिसरात दोन धर्मांचे एकत्र पूजन केले जाणारे एक अनोखे शिवमंदिर असून त्याला महाकाल मंदिर असे नाव आहे. शिवरात्रीला येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भोलेबाबाच्या दर्शनाला येतात. या मंदिरात शिव आणि गौतम बुद्ध अश्या दोघांची पूजा अर्चा केली जाते. हिंदू पुजारी आणि बौध्द भिक्षू एकाचवेळी एकत्र दोन्ही देवांची पूजाअर्चा करतात. होली हिलवर हे अनोखे मंदिर आहे.


या मंदिर आवारात गणेश, कालीमाता, भगवती आणि हनुमान यांचीही मंदिरे आहेत. येथे एक गुहा असून तेथे बौध्द भाविक प्रार्थना करतात. मंदिरात प्रवेश करताच जणू स्वर्गात आल्याचा अनुभव येतो. प्रवेशद्वारावर घंटा आणि बौद्ध धर्माच्या रंगीत पताका स्वागत करतात. महाकाल शंकराचे मंदिर हिंदू शैलीचा अप्रतिम नमुना असून या गोलाकार मंदिरात मध्यभागी नंदी आहे. शंकर येथे लिंगस्वरुपात विराजमान असून लिंगाजवळच गौतम बुद्धाची प्रतिमा आहे. बुद्ध जयंतीला सुद्धा या मंदिरात मोठी गर्दी असते.

Leave a Comment