डेन्मार्कच्या या सुंदर बेटावर केली जाते देवमाशांची कत्तल


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
डेन्मार्क हा आनंदी लोकांचा देश आहे. अवघी ५७ लाख लोकसंख्या असलेल्या या देशात अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत. येथील बेटे फारच सुंदर असून या बेटांची सफर म्हणजे जणू परीराज्याची सफर वाटावी. त्यातील एक आहे फेरो बेट. हे बेट डेन्मार्कचा भाग असले तरी युरोपियन युनियनचा हिस्सा नाही. या बेटावरचे नियम कायदे वेगळे आहेत.

५० हजार लोकवस्तीच्या या सुंदर बेटावर दर वर्षी उन्हाळ्यात ‘द ग्राउंड’ नावाची एक वेगळी परंपरा पाळली जाते. यात समुद्री पायलट देवमाशांची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जाते. हे मासे इतक्या मोठ्या प्रमाणावर मारले जातात की त्यामुळे समुद्राचे पाणी त्यांच्या रक्ताने लालभडक होते. २०१९ मध्ये या बेटावर उन्हाळ्यात १ हजाराहून अधिक देवमासे मारले गेले होते. या परंपरेविरुद्ध पर्यावरणवादी आवाज उठवू लागले आहेत.


या बेटावरील लोकांच्या आहारात पायलट देवमासे मुख्य अन्न आहे. या माशांची शिकार केल्यावर एकमेकांना त्याचे मांस फुकट वाटले जाते. येथे देवमाश्याच्या शिकारीला कायद्याने मान्यता आहे. मासेमारी आणि त्यासंदर्भातील अन्य उद्योग हेच येथील रहिवाश्यांचे उपजीविकेचे साधन आहे. येथे जंगले नाहीत. शेती नाही त्यामुळे धान्य कमी आहे. त्यामुळे मासे आणि त्यातही देवमासे हेच त्यांचे मुख्य अन्न आहे.

हिरवीगार कुरणे, सुंदर समुद्रकिनारे आणि शांत संथ जीवन यामुळे या बेटाला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात.

Leave a Comment