’83’ मधील हा फोटो पाहून तुम्ही नक्की बुचकुळ्यात पडाल


भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर देशासाठी पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट येणार आहे. अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटात तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. यात दीपिका पादुकोणदेखील त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार असून प्रेक्षकांमध्ये तिच्या भूमिकेविषयी प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटातील अनेक भूमिकांवरील पडदा आतापर्यंत दूर करण्यात आल्यानंतर आता या बहुचर्चित चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूकदेखील नुकताच रिलीज करण्यात आला आहे.


दीपिका ’83’ या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा साकारत असून रिलीज केलेल्या फोटोमध्ये दीपिका हुबेहूब रोमी भाटिया यांच्यासारखी दिसत असल्यामुळे दीपिका या भूमिकेसाठी योग्य असल्याचे आता स्पष्ट होत आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर दीपिकाने याबाबत प्रतिक्रिया देताना, देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या क्षणावर आधारित चित्रपटाचा एक भाग होता आले ही माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे. एका पत्नीची पतीला त्याच्या यशापर्यंत पोहोचवण्याच्या मार्गामध्ये भूमिका किती महत्त्वाची असते मी हे स्वत: जवळून पाहिले असल्यामुळे त्यांच्या पतीच्या यशासाठी ज्या महिला स्वत:चे सर्वस्व अर्पण करतात त्या साऱ्या महिलांना 83 हा चित्रपट समर्पित असल्याचे दीपिका म्हणाली.

Leave a Comment