लग्नासाठी बेरोजगार डॉक्टरची जाहिरात, वधूसाठी ठेवल्या या विचित्र अटी

लग्नासाठी वृत्तपत्रात वर-वधूसाठी जाहिरात देणे ही सामान्य बाब आहे. ऑनलाईन वधू-वर शोधण्याचा ट्रेंड वाढला असला तरी देखील आजही अनेक जण वृत्तपत्रात मॅट्रोमोनियल जाहिराती देत असतात. अनेकदा या जाहिरातींमध्ये वधू-वरासाठी अशा अटी दिलेल्या असतात की ते वाचूनच हसायला येते. अशीच एक मॅट्रोमोनियल जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही जाहिरात एका 31 वर्षीय अभिनव कुमार नावाच्या डेटिंस्टने दिली आहे. या डॉक्टरला आपल्यासाठी सुंदर, इमानदार आणि कट्टर देशभक्त अशी बायको हवी आहे.

या डॉक्टरला आपल्यासाठी अती गोरी, सुंदर, ईमानदार, विश्वास करण्यायोग्य, प्रेम आणि काळजी घेणारी, शूर, ताकदवर आणि श्रींमत अशी वधू हवी आहे.

या व्यतरिक्त या डॉक्टराने वधुसाठी कट्टर देशभक्त, भारतीय सैन्य आणि खेळाची क्षमता वाढवणारी, कट्टर मात्र सहानभूती असलेली, लहान बाळांचा सांभाळ करणारी, चांगला स्वयंपाक करणारी, झारखंड अथवा बिहारमधील हिंदू ब्राह्मण आणि 36 पैकी 36 गुण जुळायला हवेत अशा विचित्र अटी ठेवल्या आहेत.

या जाहिरातीमधील खास गोष्ट म्हणजे जाहिरात देणारा डॉक्टर स्वतः बेरोजगार आहे. मात्र त्याला स्वतःसाठी सर्वगुण संपन्न अशी पत्नी हवी आहे.

ही मॅट्रोमोनियल जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत.

 

Leave a Comment