‘सॅमसंग गॅलेक्सी बड्स+’ चे प्री बुकिंग भारतात सुरू

काही दिवसांपुर्वीच लाँच झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी बड्स+ ची भारतात प्री बुकिंग सुरू झाले आहे. प्री बुकिंग आता सुरू झाले असले तरी ग्राहकांना डिलिव्हरी 6 मार्चनंतर मिळणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी बड्स+ ची किंमत 11,990 रुपये आहे. यासोबतच ग्राहक यांना 564.41 रुपये मासिक हफ्त्यावर देखील खरेदी करू शकतात. हे बड्स ग्राहकांना काळा, निळा आणि पांढऱ्या रंगात मिळतील.

कंपनीने या बड्समध्ये शानदार साउंड क्वॉलिटीसाठी 3 माइक, वुफर आणि टू-वे स्पीकर दिले आहेत. सोबतच युजर्सला यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 आणि यूएसबी पोर्ट टाइप सी सारखे फीचर्स मिळतील.

या बड्समध्ये 270एमएएच बॅटरी मिळेल, जी क्विक चार्जिंग सपोर्ट करते. कंपनीने दावा केला आहे की 3 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 60 मिनिटे बॅटरी बॅकअप मिळेल. सोबतच या बड्सची केस 11 तास बॅटरी लाईफ सोबत येते.

Image Credited – slashgear

सॅमसंग गॅलेक्सी बड्स+ डिव्हाईसला कनेक्ट करण्यासाठी युजर्सला प्ले स्टोरवरून Galaxy Wearable आणि अ‍ॅप स्टोरवरून Galaxy Buds+ अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.  हे बड्स+ आयओएस 10 आणि अँड्राईडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करतात.

Leave a Comment