आता नव्या तारखेला रिलीज होणार राजकुमार राव आणि जान्हवीचा ‘रुही-अफ्जा’


अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या आगामी ‘रुही-अफ्जा’ या चित्रपटाची नवी रिलीज डेट नुकतीच रिलीज करण्यात आली आहे. हा चित्रपट यापूर्वी २० मार्च २०२० ला रिलीज होणार होता. पण, आता ‘रुही-अफ्जा’ हा चित्रपट ५ जूनला रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

जान्हवी, राजकुमार राव व्यतिरिक्त ‘रुही-अफ्जा’ या चित्रपटात वरुण शर्मादेखील भूमिका साकारणार आहे. जान्हवी कपूर या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणार आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाच्या रिलीजची तारीख बदलल्याचे जाहीर केले आहे.


हार्दिक मेहता ‘रुही-अफ्जा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. दिनेश विजान आणि मृगदीप सिंबा चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाच्या शूटींगला गेल्या वर्षी जून महिन्यापासून सुरूवात झाली होती. उत्तर प्रदेशमधील काही भागांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे.

‘धडक’ चित्रपटाद्वारे जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिला या चित्रपटानंतर बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. ती करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच, वैमानिक गुंजन सक्सेना यांच्यावर आधारित ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ या चित्रपटातही ती मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट २४ एप्रिलला रिलीज होणार आहे तर आता ‘रुही-अफ्जा’ हा चित्रपट ५ जूनला भेटीला येणार आहे.

Leave a Comment