पीपीएफ खात्याच्या नियमांमध्ये झाले हे महत्त्वाचे बदल

नोकरदारवर्ग भविष्याच्या दृष्टीने पब्लिक प्रोव्हिडन्ट फंडामध्ये (PPF) गुंतवणूक करत असतो. यामध्ये गुंतवणूक केल्याने मोठा नफा मिळतो. डिपार्टमेंट्स ऑफ पोस्ट्सने पब्लिक प्रोव्हिडन्ट फंडाच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. 12 डिसेंबरला नॉटिफिकेशनद्वारे या बदलांबाबत माहिती देण्यात आली होती. या बदलेल्या नियमांविषयी जाणून घेऊया.

खाते उघडण्यासंबंधी नियम –

पब्लिक प्रोव्हिडन्ट खाते उघडताना कमीत कमी रक्कमेत बदल करण्यात आला आहे. जर तुम्ही एखाद्या अज्ञान व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा करत असाल, तर ही रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी नसावी. रक्कम 50 रुपयांच्या मल्टीपलमध्येच असणे गरजेचे आहे. सोबतच पीपीएफ खाते उघडण्यासाठी आता फॉर्म ए च्या जागी फॉर्म 1 भरावा लागेल.

मॅच्युरिटीसंबंधी नियम –

पीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटीची मुदत 15 वर्ष असते. मात्र आता तुम्ही हे खात्याची मुदत आणखी 5 वर्ष वाढवू शकता. यासाठी खातेधारकाला मॅच्युरिटीचा कालावधी संपण्याच्या 1 वर्षांच्या आत फॉर्म 4 भरून द्यावा लागेल. आधी यासाठी फॉर्म एच भरावा लागत असे.

विना डिपॉजिट खाते –

जर तुम्ही मॅच्युरिटीनंतर विना डिपॉजिट करता पीपीएफ खाते सुरू ठेवले तर मॅच्युरिटीच्या वेळी जी रक्कम होती, त्यावर देखील तुम्हाला व्याज मिळेल. विना डिपॉजिट पीपीएफ खाते मॅच्युरिटीनंतर देखील सुरू ठेवल्यास तुम्हाला एका आर्थिक वर्षात एकदा रक्कम काढण्याची संधी मिळेल.

पीपीएफ कर्जावरील व्याज –

जर तुम्ही पीपीएफ खात्याच्या आधारावर कर्ज घेतले असेल तर तुम्ही प्रिंसिपल अमाउंट पे-इन-स्लीपद्वारे जमा करू शकता. याला तुमच्या खात्यातून क्रेडिट केले जाईल. प्रिसिंपल रक्कम पुर्णपणे परत केल्यानंतर त्यानंतर वार्षिक 1 टक्के व्याजदराच्या आधारावर दोन महिन्यांपेक्षा कमी हफ्त्यात व्याजाची रक्कम परत करता येईल. पीपीएफ खात्यावरून घेतलेले कर्ज निश्चित कालावधीमध्ये परत न केल्यास दंड म्हणून वर्षाला 6 टक्के दरानुसार व्याज भरावे लागेल.

असे कॅलक्यूलेट होईल व्याज –

पीपीएफ खात्यावर पुर्ण महिन्याचे व्याज मिळवण्यासाठी रक्कम महिन्याच्या 5 तारखेच्या आत जमा करावी. व्याज प्रत्येक महिन्याला खात्यावर जमा सर्वात कमी रक्कमेच्या आधारावर मोजले जाते. ही रक्कम महिन्याच्या 5 तारखेपासून ते अंतिम तारखेपर्यंत असलेली सर्वाधिक कमी रक्कम असेल.

Leave a Comment