एवढ्या रुपयांमध्ये खरेदी करा ‘सायबर विमा’, मिळवा अनेक फायदे

देशात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. मात्र यासोबतच सायबर गुन्ह्यांचे, फसवणुकीचे प्रमाण देखील वाढल्याचे पाहण्यासस मिळत आहे. हॅकर्स फसवणुकीच्या नवनवीन पद्धती शोधत आहेत. यामुळे सायबर विम्याचे महत्त्व वाढत चालले आहे.

सायबर विम्यामध्ये आयडेंटिटी चोरी, सोशल मीडिया लायबिलिटी, सायबर स्टॉकिंग, मालवेअर अटॅक, आयटी चोरीपासून नुकसान आणि सायबर एक्सटॉर्शन इत्यादी गोष्टींपासून सुरक्षा मिळते. सायबर विमा ई-मेल स्पुकिंग आणि फिशिंगद्वारे होणाऱ्या नुकसानीपासून देखील बचाव करते. तुम्हाला 1 लाख रुपयांचा सायबर विमा घेण्यासाठी वर्षाला 600 ते 800 रुपये खर्च करावे लागतील.

तुम्ही घेत असलेल्या सायबर विम्यामध्ये ई-मेल स्पुफिंग, फिशिंग, बँक खाते, डेबिट-क्रेडिट कार्ड अथवा ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षा, गोपनीयता, मालवेअरद्वारे डाटा अथवा कॉम्प्युटरला नुकसान झाल्यानंतर पुन्हा इंस्टॉल करण्यासाठी खर्च, इतर सेवा व न्यायालयात सुनावणीसाठी खर्च मिळतो की नाही, हे तपासून घ्या.

ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी अनोखळी मेसेज, ईमेल, पॉपअप जाहिरातीवर क्लिक करू नका. अज्ञात वेबसाईटवर खाजगी माहिती रजिस्टर्ड करू नका. तसेच वेबसाईटच्या पुढे https:// आहे की नाही हे तपासा. तुमच्या अकाउंटला सुरक्षित पासवर्ड ठेवा.

जागतिक स्तरावार सायबर विम्याचा बाजार वेगाने वाढत आहे. 2025 पर्यंत हा बाजार 20 अब्ज डॉलर एवढा होण्याची शक्यता आहे. मात्र भारतात हा बाजार सध्या केवळ 500 ते 700 कोटी रुपये आहे.

2019 च्या क्विक हिलच्या एका अहवालानुसार, महाराष्ट्र, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि गुजरात या राज्यातील नागरिकांसोबत सर्वाधिक ऑनलाईन फसवणूक झाली आहे.

Leave a Comment