जागतिक मातृभाषा दिन : अशी झाली होती हा दिवस साजरा करण्याची सुरूवात

जगभरात 21 फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जगभरात भाषा आणि संस्कृतिप्रती जागृकता निर्माण करणे हा असतो. यूनेस्कोने 17 नोव्हेंबर 1999 ला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची घोषणा केली होती. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी 21 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो.

21 फेब्रुवारी 1952 ला ढाका युनिवर्सिटीच्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी तत्कालिन पाकिस्तान सरकारच्या भाषा नीतिला जोरदार विरोध केला होता. पाकिस्तानच्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार देखील केला. मात्र वाढत्या विरोधामुळे अखेर तत्कालिन पाकिस्तान सरकारने बांग्ला भाषेला अधिकृत दर्जा दिला. या आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या युवकांच्या स्मृती निमित्ताने यूनेस्कोने पहिल्यांदा 1999 मध्ये हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

या दिनानिमित्ताने यूनेस्को आणि यूएन जगभरात भाषा आणि संस्कृतीसंबंधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. दरवर्षी एक खास थीम असते. या वर्षीची थीम “स्थानिक भाषा विकास, शांतता आणि सलोख्यासाठी महत्त्वाच्या” अशी आहे.

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाला टंग डे (Tongue Day), मदर लँग्वेज डे (Mother language Day), मदर टंग डे (Mother Tongue Day) , लँग्वेज मूव्हमेंट डे (Language Movement Day) आणि Shohid Dibosh या नावाने देखील ओळखले जाते.

भारतात देखील शेकडो भाषा बोलल्या जातात. वर्ष 1961 च्या जनगणनेनुसार, भारतात 1652 भाषा बोलल्या जातात. तसेच सध्याच्या रिपोर्टनुसार, भारतात 1365 मातृभाषा आहेत.

Leave a Comment