या हुकूमशहाच्या शासन काळात मिळत होती मोफत वीज

सर्वसाधारणपणे हुकूमशहा हे आपल्या विचित्र कायदे आणि क्रुरतेसाठी ओळखले जातात. मात्र जगात असा एक हुकूमशहा होऊन गेला, जो क्रूर तर होताच मात्र त्याने आपल्या देशातील लोकांसाठी असे काही केले की जे इतर देशातील पंतप्रधान-राष्ट्रपतींनी देखील केले नसेल.

या हुकूमशाहचे नाव मुअम्मर गद्दाफी असून, तो लीबियाचा शासक होता. गद्दाफीने आपल्या शासनाच्या काळात संपुर्ण देशातील नागरिकांचे वीज बिल माफ केले होते. नागरिकांनी कितीही वीज वापरली तरी देखील त्याचा सर्व खर्च सरकार उचलत असे.

Image Credited – The Jerusalem Post

गद्दाफीने आपल्या देशातील सर्व नागरिकांनी स्वतःचे घर देण्याचा निश्चय केला होता. एवढेच नाही तर जोपर्यंत सर्व नागरिकांना हक्काचे घर देत नाही तोपर्यंत स्वतःच्या आई-वडिलांसाठी घर बनवणार नाही, अशी शपथ गद्दाफीने घेतल्याचे सांगितले जाते.

लीबियाचा शासक झाल्यानंतर त्याने स्वतःची बँक सुरू केली होती. ही बँक देशातील लोकांना कर्ज देत असे, मात्र त्यांच्याकडून व्याज घेत नसे.

Image Credited – Amarujala

सांगण्यात येते की, लीबियामध्ये लग्न करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला गद्दाफीच्या काळात 50 हजार डॉलर (जवळपास 35 लाख रुपये) दिले जात. तसेच बाळांच्या जन्मावेळी देखील 3 लाख रुपये सरकारतर्फे दिले जात असे.

Image Credited – thedailybeast

गद्दाफीने लीबियावर तब्बल 42 वर्ष शासन केले. मात्र 20 ऑक्टोंबर 2011 ला विद्रोही गटाच्या सैन्याने गोळ्या झाडून गद्दाफीची हत्या केली.

Leave a Comment