नोकरी सोडून चहा विकत या महिलेने कमावले कोट्यावधी रुपये

भारतात चहा हे एखाद्या पेय पदार्थापेक्षा अधिक आहे. चहा पिणाऱ्यांची संख्या भारतात मोजता येणार नाही एवढी आहे. मागील काही काळात चहाने व्यावसायिक दृष्टीने बाजारात एक स्थान निर्माण केले आहे. मात्र एखादी व्यक्ती चहा विकून कोट्याधीश झाल्याचे कधी ऐकले आहे का ? मात्र असे झाले आहे. ते देखील एखादी भारतीय व्यक्ती नाही, तर अमेरिकेतील एक महिला चहा विकून कोट्याधीश झाली आहे.

या महिलेचे नाव ब्रुक एडी असून, 2002 मध्ये एका कार्यक्रमासाठी ती भारतात आली होती. आपल्या प्रवासादरम्यान एडीने भारतातील अनेक ठिकाणी प्रवास केला व भारतीय चहाचा स्वाद घेतला.

Image Credited – navbharattimes

येथील चहा एडीला एवढा आवडला की, तिने अमेरिकेत परतल्यावर कोलोराडो येथे स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरू केला. भारतातील चहाच्या स्वादाने तिच्या लक्षात आले होते की, अमेरिकेतील चहाचा स्वाद भारतीय चहापेक्षा खूपच वेगळा आहे.

सुरूवातील ब्रुकने आपल्या कारच्या डिक्कीमध्ये चहा विकण्यास सुरूवात केली. तिने आपल्या स्टार्टअपला देखील ‘भक्ती चाय’ असे भारतीय नाव दिले. लवकरच आजुबाजूच्या लोकांना तिच्या या चहाचा स्वाद आवडू लागला. 2007 मध्ये दोन मुलांची आई असलेल्या ब्रुकने नोकरी सोडत ‘भक्ती चाय’ नावाने एक वेबासाईट बनवली.

View this post on Instagram

Spice up your weekend 💃

A post shared by Bhakti Chai (@drinkbhakti) on

भक्ती चायच्या वेबसाईटनुसार, ब्रुक अनेक प्रकारचा चहा देते. यात आल्याचा चहा, ग्रीन चहा, ग्रीन चहा स्मूदी, चॉकलेट चहा एनर्जी बाइट्स, चॉकलेट चहा ट्रफल असे प्रकार आहेत. आतापर्यंत ब्रुकला आपल्या या स्टार्टअपद्वारे 250 कोटी रुपयांपेक्षा अधिक नफा झाला आहे.

Leave a Comment