एचडीएफसी बँकेच्या अ‍ॅपचे शटडाऊन, करता येणार नाही व्यवहार

जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एचडीएफसी बँक 29 फेब्रुवारी 2020 पासून आपले जुने व्हर्जन मोबाईल अ‍ॅप बंद करणार असून, यानंतर ग्राहक पैशांचे व्यवहार करू शकणार नाही.

बँकेने यासाठी आपल्या खातेधारकांना मेसेज पाठवून अलर्ट देखील केले आहे. जुने व्हर्जन बंद होणार असले तरी देखील ग्राहक लेटेस्ट व्हर्जन अ‍ॅप स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. जुन्या व्हर्जनमध्ये तांत्रिकी खराबीमुळे युजर्सला पैसे पाठवण्यास अडचण येत होती.

एचडीएफसी बँकेच्या मेसेजनुसार, जर ग्राहकांनी 29 फेब्रुवारी 2020 च्या आधी अ‍ॅप अपडेट केले नाही तर रात्री 12 नंतर अ‍ॅप काम करणे बंद करेल. ग्राहक 1 मार्चपासून अ‍ॅपद्वारे कोणतेही व्यवहार करू शकणार नाही.

खातेधारक एचडीएफसी बँकेचे नवीन अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. यामध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आलेले आहेत.

युजर्स या अ‍ॅपद्वारे पैसे ट्रांसफर करण्यासोबतच क्रेडिट कार्डसाठी देखील अर्ज करू शकतात. बँक या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना ठेवींबाबत आणि पासबूक संबंधीत माहिती देखील देईल. युजर्स अ‍ॅपद्वारे पेमेंट संबंधीत माहिती तपासू शकतात.

Leave a Comment