आईनस्टाईनच्या आवडत्या खेळण्याचा होणार लिलाव

महान शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांचे आवडते खेळणे मोजेक पर्ल गेमचा पुढील महिन्यात लिलाव होणार आहे. हे खेळणे 60 हजार डॉलरला (जवळपास 42.92 लाख रुपये) विकले जाण्याची शक्यता आहे. या जर्मन खेळण्यात 520 रंगीत मोती अथवा छोटे चेंडू असतात. ज्यांना पॅटर्न बनविण्यासाठी पंच-होल फ्रेममध्ये ठेवण्यात येते.

विक्रेता बोन्हम्स यांनी सांगितले की, आईनस्टाईन यांचे हे दुर्मिळ खेळणे संग्रह करण्यासारखे आहे. हे खेळणे आकारात 7.3 इंच लांब आणि 1.5 इंच रुंद आहे. हे खेळणे 1870 मध्ये बनविण्यात आले होते. याची विक्री 6 मार्चला करण्यात येईल.

Image Credited – Bhaskar

ऑक्शन वेबसाईटनुसार, या खेळाचा आईनस्टाईन यांच्या जीवनावर मोठा परिणाम होता.  या खेळण्याचा त्यांच्या सुरूवातीच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे.

रिपोर्टनुसार, या खेळण्याला 18 एप्रिल 1955 ला आईनस्टाईन यांच्या मृत्यूनंतर एका मित्राला भेट म्हणून देण्यात आले. मागील वर्षी जून महिन्यात याला 13 हजार डॉलरला विकण्यात आले होते. या आधी या खेळण्याला टोकियोच्या मित्सुओ आइडा संग्रहालयात 2005-06 मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

Leave a Comment