जाणून घ्या ट्रम्प वापरत असलेल्या ‘एअरफोर्स वन’ विमानाचे वैशिष्ट्य

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे 24 आणि 25 फेब्रुवारी 2020 ला भारत दौऱ्यावर येणार आहेत. या निमित्ताने त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. ट्रम्प हे ‘एअरफोर्स वन’ या विशेष विमानाने भारतात येणार आहेत. या विमानाचे वैशिष्ट्य जाणून घेऊया.

अमेरिकन एअरफोर्सच्या ज्या विमानात राष्ट्रपती प्रवास करतात त्याला एअरफोर्स वन म्हटले जाते. बोईंग 747-200 बी सीरिजमधील अशी दोन विमाने आहेत. ज्याच्या मागील बाजूला 28000 आणि 29000 असा कोड लिहिलेला असतो. विमानावर मोठ्या अक्षरात ‘United States of America’ असे लिहिले असते व अमेरिकेच्या राष्ट्रपतींची मोहर असते.

Image Credited – Amarujala

एअरफोर्स विमानात 4000 वर्गफूट जागा असते. विमान आतील भागात तीन विभागात विभागलेले असते. यातील राष्ट्रपतींसाठी खास सुईट, एक मोठे कार्यालय, कॉन्फ्रंस रून आणि बाथरूम असते. यात एक मेडिकल सुईट देखील असते, ज्याचा गरज पडल्यास ऑपरेशन थेअटर म्हणून वापर करता येतो. विमानात एक डॉक्टर कायमस्वरूपी उपस्थित असतो.

विमानात जेवण बनविण्यासाठी 2 वेगवेगळे किचन असतात. ज्यात एकावेळी 100 लोकांचे जेवण बनवता येते. याशिवाय राष्ट्रपतींसोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी देखील वेगळ्या खोल्या असतात.

Image Credited – Amarujala

एखाद्या राष्ट्रपतींद्वारे वापरण्यात येणारे हे जगातील सर्वाधिक आधुनिक आणि मोठे विमान आहे. या विमानात आकाशात असताना गरज पडल्यास पुन्हा इंधन भरण्याची क्षमता असते. एकावेळी या विमानात 2.03 लाख लीटर इंधन भरता येते. विमानात वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक उपकरणांवर विद्युत चुंबकिय कंपनाचा परिणाम होत नाही. विमानातील कम्यूनिकेशन सिस्टमचा वापर अमेरिकेचे राष्ट्रपती मोबाईल कमांड सेंटर म्हणून देखील करू शकतात. थोडक्यात आणीबाणीच्या स्थितीत राष्ट्रपती आपल्या सैन्य व अधिकाऱ्यांना याद्वारे कमांड देऊ शकतात.

Image Credited – Amarujala

एअरफोर्स विमानाच्या पुढे अनेक मालवाहक विमाने उड्डाण घेत असतात, जेणेकरून राष्ट्रपतींना गरजेच्या गोष्टी त्वरित मिळतील. एअरफोर्स विमानाचे संचालन आणि काळजी प्रेसिडेंशियल एअरलिफ्ट ग्रुपद्वारे घेतली जाते. हा ग्रुप व्हाइट हाऊस मिलिट्री ऑफिसचा भाग आहे. या एअरलिफ्ट ग्रुपची स्थापना 1944 मध्ये करण्यात आली होती.

Leave a Comment