जगाच्या मध्यभागी आहे हे चित्रविचित्र म्यूझियम

जगात इतिहासाच्या नोंदी असलेल्या अनेक गोष्टी आहेत. अनेक ठिकाणी हजारो वर्षांचा इतिहास लिहून ठेवलेला आहे. मात्र तुम्ही कधी ग्रेनाईटवरती शेकडो वर्षांचा मानवी इतिहास कोरून ठेवल्याचे ऐकले आहे ? असे एक ठिकाण अगदी पृथ्वीच्या मध्यभागी आहे. ‘द फादर ऑफ अमेरिकन स्कायडायव्हिंग’ म्हणून ओळखले जाणारे याक आंद्रे इस्टेल यांनी या जागेची निर्मिती केली आहे. अमेरिकेत पॅराशूट जंपिंगला लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा हात आहे.

इस्टेल आणि त्यांची पत्नी फेलिशिया हे 1980 च्या दशकात कॅलिफोर्नियाच्या दक्षिण-पुर्व भागातील युमा शहरात राहण्यास आले. ही जागा एरिझोनाच्या जवळ आहे. इस्टेल यांनी आधीच येथे 2600 एकर जागा खरेदी करून ठेवली होती. ही जागा सोनोरन वाळवंटात येते.

Image Credited – Amarujala

या वाळवंटात काहीही नव्हते. तरी देखील इस्टेल व त्यांच्या पत्नीने येथे राहण्याचा निर्णय घेतला. अखरे 1985 मध्ये इस्टेल यांनी कॅलिफोर्नियाच्या स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आपल्या जमिनीवर स्मारक बनवून त्याला अधिकृतरित्या जगाचे केंद्रीय स्थान घोषित केले. पृथ्वी गोल असल्याने कोणत्याही ठिकाणाला जगाचे केंद्र म्हटले जाऊ शकते.

येथे कोणतेही शहर नसल्याने इस्टेल यांनी 15 लोकांच्या मदतीने ‘फेलिसिटी’ नावाचे शहर स्थापले. या 15 जणांनी इस्टेल यांना महापौर म्हणून देखील निवडले. मात्र इस्टेल यांना अधिक काहीतरी करायचे होते.

Image Credited – Amarujala

इस्टेल यांचा उद्देश ग्रेनाइटने असे स्मारक बनवण्याचे होते, ज्याला दुसऱ्या जगातून येणारी लोक देखील याला मानवतेची डायरी समजतील. इस्टेल यांनी सर्वात प्रथम कोरियन युद्धातील आपल्या सहकार्यांची नावे ग्रेनाइटवर कोरून स्मारक बनवले.

यानंतर इस्टेल यांनी जेथे शिक्षण झाले होते त्या प्रिंसटन यूनिवर्सिटीचे मेमोरियल, त्यांचे आई-वडीलांची माहिती अशा अनेक गोष्टींची नोंद केली. 1991 मध्ये हे त्रिकोणी स्मारक बनून तयार झाले. हे स्मारक 100 फूट लांब, 4.5 फूट उंच आणि ग्रेनाइटच्या 60 पॅनलद्वारे तयार करण्यात आले.

Image Credited – Amarujala

आज वाळवंटात इस्टेटद्वारे बनवलेले 20 स्मारक उभे असून, याला द म्यूझियम ऑफ हिस्ट्री इन ग्रेनाइट नाव देण्यात आलेले आहे. इस्टेल म्हणतात की, जेव्हा मंगळावरील लोक पृथ्वीबद्दल जाणून घ्यायचे असेल, तेव्हा ते येथेच येतील.

ग्रेनाइटच्या स्मारकावर इस्टेल यांनी बिग बँग थेअरीपासून ते अमेरिकचे राष्ट्रपती बराक ओबामाचा देखील उल्लेख केला आहे. येथे हिंदुत्व, जीसस, एट्टिला, पायथागोरस, लिंकन यांचे प्रसिद्ध गेटिसबर्ग भाषण, मनुष्याचा चंद्रावरील प्रवास, दहशतवाद आणि मानवी इतिसाहाबद्दल अनेक गोष्टी कोरण्यात आलेल्या आहेत.

Image Credited – Amarujala

म्यूझियम पाहण्यासाठी लोक हिवाळ्यात येतात. त्यावेळी येथील तापमान कमी असते. दोन ते 3 डॉलरमध्ये तुम्ही हे स्मारक पाहू शकता. येथे फोटो काढण्यासाठी पैसे द्यावे लागतात. या वाळवंटातील स्मारकाची सर्वात उंच इमारत एक पांढरे चर्च आहे. इस्टेल व त्यांची पत्नी येथेच एका घरात राहतात.

इस्टेल यांना वाटते की, एक वेळ अशी येईल जेव्हा मनुष्य ग्रहच नाही तर ताऱ्यांवर देखील कॉलनी बनवेल. तेथून एखादा मनुष्य जर पृथ्वीवर परतला, तर त्याच्यासाठी येथे एक संदेश असेल. तो संदेश असेल, “भविष्यातील मानवा, जे पृथ्वीपासून दूर घर वसवतील, त्यांनी येथे येऊन आपल्या सर्वांचा सामूहिक इतिहास जाणून घ्यावा व आमच्याशी नाते जोडावे.”

Leave a Comment