असे असतात पुरुष


फोटो सौजन्य स्टार्स अनफोल्डेद
आपला समाज पुरुषप्रधान समाज आहे. येथे बायका अश्याच असतात, तश्याच असतात याची चर्चा नेहमीच सुरु असते पण पुरुष कसे असतात याविषयी फारसे बोलले जात नाही. अर्थात पुरुष कसे असतात यावर बरेच संशोधन सुरु आहेच. त्यातील काही शोध येथे देत आहोत. पहिले म्हणजे आपला समाज पुरुषप्रधान संस्कृती मानणारा आहे त्यामुळे येथील पुरुषांना मर्द म्हणवून घेणे आवडते. कारण त्यातून शक्ती प्रतीत होते. आपला लुक रफटफ असावा अशी प्रत्येक पुरुषाची इच्छा असते.

पुरुषांच्या आयुष्यातला बराच काळ कुठे जातो हे ऐकले तर नवल वाटेल. संशोधनात असे दिसले आहे की पुरुषाच्या आयुष्यातील एक वर्षाचा काळ हा मुली न्याहाळण्यात जात असतो तर ६ महिन्याचा काळ दाढी करण्यात जातो. सुंदर पत्नी असणारे पुरुष जीवनात संतुष्ट असतात. पुरुष दिवसाला सरासरी ६ वेळा खोटे बोलतात तर बायकांमध्ये हे प्रमाण ३ खोटे इतके आहे.


टकलू पुरुष सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत १३ टक्के अधिक जाड व उंच दिसतात. पुरुष एक मिनिटात ११ वेळा पापण्या फडकावितात तर बायका १९ वेळा. खोटे वाटेल पण १६ व्या शतकात पुरुष सुद्धा हाय हिल्स वापरत असत. पत्नी किंवा गर्लफ्रेंड सोबत असेल तर पुरुष हळू चालतात.

अमेरिकेत दरवर्षी सरासरी ४५० पुरुष स्तनाच्या कॅन्सरने मृत्युमुखी पडतात. महिलांच्या तुलनेत पुरुषांवर आकाशातली वीज कोसळण्याची शक्यता अधिक असते. महिलांच्या तुलनेत पुरुषांना दुप्पट घाम येतो आणि महिलांच्या तुलनेत पुरुष आत्महत्येचे प्रमाण ३ ते चार पटीने अधिक आहे.

Leave a Comment