वडिलांच्या पावलावर पावले टाकतोय समित द्रविड


फोटो सौजन्य व्हीटीव्ही
टीम इंडिया मध्ये शैलीदार आणि अतिशय संयमित खेळाचे दर्शन घडवून ‘ द वॉल’ अशी ओळख मिळविलेल्या माजी कप्तान राहुल द्रविड यांचा मुलगा समित वडिलांच्या पावलावर पाउल टाकत असल्याचे दिसून आले आहे. समितने शालेय पातळीवर अंडर १४ क्रिकेट सामन्यात डबल सेंच्युरी झळकविली आहे. बीटीआर शिल्ड अंडर १४ ग्रुप १ डिव्हिजन स्पर्धेत समितने शाळेचे प्रतिनिधित्व करताना शनिवारी १४६ चेंडूत २०७ धावा काढल्या त्यात ३३ चौकार आहेत. विशेष म्हणजे दोन महिन्यातली त्याची ही दुसरी डबल सेन्चुरी आहे. वरील सामन्यात त्याने दोन विकेट ही घेतल्या.

गतवर्षी डिसेंबरमध्ये समितने अंडर १४ इंटरझोन स्पर्धेत धारवाड झोन विरुद्ध व्हाईस प्रेसिडेंट ११ मध्ये २५६ चेंडूत २०१ रन्स काढल्या होत्या आणि तीन विकेट घेतल्या होत्या. दोन महिन्यात समितची कामगिरी पाच सामने, ६८१ धावा आणि ७ विकेट अशी भरदार झाली आहे.

Leave a Comment