नितांतसुंदर बस्तर


फोटो सौजन्य अनएक्स्प्लोर्ड बस्तर
छत्तीसगढ राज्याला निसर्गाने भरभरून सौंदर्याचे वरदान दिले आहे त्यातील मेरुमणी म्हणता येतील असा भाग म्हणजे बस्तर. दुर्दैवाने बराच काळ ह भाग नक्षलग्रस्त म्हणून कुप्रसिध्द असून त्यामुळे या भागाचा विकास म्हणावा तितका झालेला नाही. मात्र तरीही पर्यटक बस्तरला आवर्जून भेट देऊ लागले आहेत. लाल मातीचा, जगाला फारसा परिचित नसलेला हा भाग सुंदर जंगले, विपुल धबधबे, झरे, नद्या यांनी समृद्ध आहे.


बस्तरचा दंतेवाडा नक्षली कारवायांसाठी ओळखला जात असला तरी याच भागातून वाहणाऱ्या इंद्रावती नदीचे सौंदर्य अप्रतिम आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. जगदलपूर येथे मेंद्री घुमरा धबधबा पाहण्यासारखा. येथेच एका मोठी दारी असून तिला व्हॅली ऑफ फॉग म्हणजे धुक्याची दरी म्हटले जाते. जगदलपुरा येथील शाही पॅलेस हे मुख्य आकर्षण असून त्याचे आता स्मारक बनले आहे. शाही परिवाराच्या विविध वस्तू येथे पाहायला मिळतात.


इंद्रावती नदीवरच चित्रकुट धबधबा म्हणजे भारताचा नायगारा. ९५ फुट उंचावरून कोसळणारा हा धबधबा पाहायला खूप गर्दी असते. येथे नावेतून धबधब्याजवळ जाता येते. पावसाळ्यात त्याचे सौंदर्य अनेक पटीने खुलते. दंतेवाडापासून २२ किमीवर उंच ढोलकल पहाडावर प्रचंड गणेश मूर्ती असून ही प्राचीन मूर्ती येथील लोकांची रक्षणकर्ती मानली जाते. ही मूर्ती ३ हजार फुट उंच पहाडावर आहे. जवळच इंद्रावती राष्ट्रीय उद्यान आहे.


मुनगाबहर नदीवरचा तीर्थगढ फॉल ३०० फुटावरून कोसळतो आणि हा भारतातील सर्वधिक उंचीच्या झऱ्यांपैकी एक आहे.

Leave a Comment