ट्रम्पभक्त बुसा कृष्णाला ट्रम्प भेटीची इच्छा


दोन दिवसांच्या भारत भेटीवर येत असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प कुणाकुणाला भेटणार याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. तेलंगणातील पेशाने शेतकरी असलेला बुसा कृष्णा अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांचा भक्त असून तो त्यांना भगवान मानतो. ट्रम्प यांची भेट घेणाऱ्या मान्यवरांची यादी भली मोठी असेल पण बुसानेही ट्रम्प यांची भेट घडावी अशी विनवणी सरकारकडे केली असून त्याला त्याच्या या देवाचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे आहे.

बुसा ट्रम्प यांना देव मानतो आणि ट्रम्प यांचा ६ फुटी पुतळा त्याने त्याच्या घरात बसविला आहे. ट्रम्प यांच्या ७३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने हा पुतळा बसविला आणि गावकऱ्यांना मेजवानीही दिली. त्यासाठी त्याने १ लाख ३० हजार रुपये खर्च केला. बुसा जनगावचा रहिवासी आहे. ट्रम्प यांचा एक फोटो सतत त्याच्यासोबत असतो आणि कोणतेही काम करण्यापूर्वी तो फोटोचे दर्शन घेतो. ट्रम्प यांना दीर्घायुष लाभावे म्हणून तो शुक्रवारी व्रत करतो. तो म्हणतो ट्रम्प मला ओळखत नाहीत पण मी त्यांना ओळखतो. अमेरिकेचे हितरक्षण करण्याचा त्यांचा पक्का निर्धार आहे आणि त्या आड ते कोणतीही गोष्ट येऊ देत नाहीत त्यामुळे मला ते आवडतात.

Leave a Comment