हे आहेत जगातील सर्वात क्रूर हुकूमशह

इतिहासात अनेक हुकूमशह हे आपल्या क्रूर कारनाम्यामुळे ओळखले जातात. त्यांच्या देशात विचित्र कायदे लागू करण्यापासून ते विचित्र सवयीसाठी अनेक हुकूमशह जगभरात ओळखले जातात. अशाच काही क्रूर हुकूमशहांबद्दल जाणून घेऊया.

Image Credited- Biography.com

इदी अमीन –

सत्तरच्या दशकात इदी अमीन या हुकूमशहाचे युंगाडावर शासन होते. त्याला आपल्या कामाला सम्मानित करण्याची खूप हौस होती. अमीन म्हणायचा की, राष्ट्रकुल देशांचे प्रमूख राणी एलिजाबेथ द्वितीय नसून, ते स्वतः हवेत. असे सांगितले जाते की, तो आपल्या राजकीय विरोधकांचे कापलेले डोके फ्रीजमध्ये ठेवत असे, मात्र हे कधी सिद्ध झाले नाही.

Image Credited – Emerson Kent

कॅलिग्यूला –

रोमन सम्राट कॅलिग्यूला देखील इतिहासाच्या पानांमध्ये एक क्रूर शासक म्हणून ओळखला जातो. त्याला शर्यतीत धावणारे घोडे आवडत असे. त्याने आपल्या आवडत्या घोड्यासाठी वेगळे घर देखील बनवले होते, जेथे सैनिक या घोड्याची सेवा करत असे. या घोड्याला सोन्याच्या भांड्यामधून दार पाजली जात असे, असे सांगितले जाते.

एवढेच नाही तर कॅलिग्यूलाने एकदा आदेश दिला होता की, सर्व बोटींना नेपल्सच्या खाडीत एका रांगेत उभे करावे. जेणेकरून त्यावरून चालत एका शहरातून दुसऱ्या शहरात जाता येईल.

Image Credited – Amarujala

फ्रांसवा डूवलियर –

हैतीचे माजी राष्ट्रपती फ्रांसवा डूवलियरचे देखील क्रूर हुकूमशहांच्या यादीत नाव येते. डूवलियरचे म्हणणे होते की प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेला शरीरात आत्म्याची ताकद येते, त्यामुळे डूवलियर केवळ 22 तारखेलाच घराच्या बाहेर निघत असे. डूवलियरने दावा केला होता की आत्म्यांच्या शक्तीमुळे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉन एफ कॅनेडी यांची हत्या झाली होती.

Image Credited – Amarujala

नियाजोव्ह –

तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती नियाजोव्ह देखील इतर हुकूमशहा देखील कमी नाही. नियाजोव्हला स्वतःला वेगळे दाखवण्याची एवढी आवड होती की, त्याने स्वतःच्या नावाने शहर, पार्कचे नाव ठेवले होते. नियाजोव्हने जानेवारी महिन्याचे नाव बदलून स्वतःच्या नावावर ठेवले होते. पुरूषांना मोठी केस ठेवण्यास देखील प्रतिबंध घातला होता.

Image Credited – Amarujala

किम जोंग इल –

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंम जोंग इल देखील आपल्या विचित्र कारनाम्यामुळे क्रूर शासक म्हणून ओळखला जातो. असे म्हटले जाते की, त्याच्या काळात उत्तर कोरियामध्ये बाजारात मनुष्याच्या मांस देखील विकले जात असे. त्याला चित्रपटाची देखील आवड होती. त्याने 1978 मध्ये दक्षिण कोरियाचे डायरेक्टर शिन सांग ओक आणि त्यांच्या पत्नीचे देखील अपहरण केले. 5 वर्ष कैदेत ठेवल्यानंतर अखेर उत्तर कोरियाच्या चित्रपट इंडस्ट्रीचा विकास करण्यास मदत करावी, या एका अटीवर त्यांना सोडले.

Leave a Comment