व्हॉट्सअ‍ॅपचे ‘Delete For Everyone’ फीचर वापरताना अशी घ्या काळजी

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर आज वॉइस कॉलिंगपासून ते चँटिंगसाठी केला जातो. आज व्हॉट्सअ‍ॅप वापरणारे कोट्यावधी युजर्स आहेत. आपल्या युजर्ससाठी कंपनी देखील अनेक खास फीचर्स लाँच करत असते. असेच एक फीचर म्हणजे डिलीट फॉर एव्हरीवन (Delete For Everyone) हे आहे. या फीचरद्वारे एका विशिष्ट वेळेत, विशिष्ट मेसेज डिलीट करता येतो. हे फीचर बघितले तर खूपच फायदेशीर आहे, मात्र याचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

या फीचरचा वापर करण्यासाठी तुमचे व समोरील व्यक्तीचे व्हॉट्सअ‍ॅप अपडेटेड असणे गरजेचे आहे. फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जन असणे अनिवार्य आहे. आयओएस प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपमधून फोटो अथवा व्हिडीओ कोणालाही पाठवला असेल व त्वरित डिलीट केले. तरी देखील फोटो अथवा व्हिडीओ आयफोनच्या गॅलेरीमध्ये सेव्ह होतो. मात्र अँड्राईड फोनमध्ये व्हिडीओ आणि फोटो गॅलेरीमधून देखील डिलीट होतात.

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवला असेल व त्याने मेसेज वाचला असेल तर हे फीचर काहीही फायद्याचे नाही. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला चुकीने मेसेज केला असेल तर तो त्वरित डिलीट करावा.

जर तुम्ही पाठवलेला मेसेज डिलीट केला तरी देखील पुढील व्यक्तीला त्याबाबत माहिती मिळेल. मेसेज डिलीट केल्यानंतर  ‘This Message was Deleted’ असे लिहून येते. यामुळे समोरील व्यक्तीला मेसेजची माहिती मिळते.

जर तुम्हाला एखादा पाठवलेला मेसेज डिलीट करायचा असेल तर तुमच्यासाठी केवळ 1 तासाचा वेळ असतो. त्यानंतर तुम्ही या फीचरचा वापर करू शकत नाही.

Leave a Comment