अशी कामगिरी करणारा विराट ठरला पहिला भारतीय

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानावर नवनवीन विक्रम करण्यासाठी ओळखला जातो. मात्र विराटने आता सोशल मीडियावर देखील एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराटने इंस्टाग्रामवर 50 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय सेलिब्रेटी ठरला आहे.

View this post on Instagram

😻

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

विराटने याबाबत प्रियंका चोप्राला मागे टाकले. प्रियंका सध्या या यादीत दुसऱ्या स्थानावर असून, तिचे सध्या इंस्टाग्रामवर 49.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

वर्ष 2020 च्या सुरूवातीला प्रियंका फॉलोअर्सच्या बाबतीत विराटच्या पुढे होती. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या टॉप -10 भारतीय सेलिब्रेटींमध्ये विराट एकमेव क्रिकेट आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे इंस्टाग्रामवर 20.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

या यादीत तिसरे नाव दीपिका पादुकोणचे असून, तिचे इंस्टाग्रामवर 44.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. जगात सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या स्थानावर असून, त्याचे इंस्टाग्रामवर 200 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Leave a Comment