तब्बल 290 टनांचा आहे जगातील हा सर्वात मोठा इलेक्ट्रिक डंपर

आंतरराष्ट्रीय मायनिंग कंपनी अँग्लो अमेरिकनने दावा केला आहे की, लवकरच जगातील सर्वात मोठ्या ई-डंपरचा वापर दक्षिण आफ्रिकेतील प्लॅटिनमच्या खाणीत करणार आहे. या ईलेक्ट्रिक डंपरचे वजन जवळपास 290 टन आहे. डंपरमध्ये डिझेलच्या जागी लिथियम आयन बॅटरी आणि हायब्रिड हायड्रोजन इंधनावर चालणारे इंजिन लावण्यात आलेले आहे. सध्या सर्वात मोठा डंपर 45 टन वजनी आहे. मात्र हा ई-डंपर त्यापेक्षाही 6 पट अधिक मजबूत असेल.

नवीन डंपर ताशी 1000 किलोवॉटने कंम्बाइन एनर्जी स्टोर करेल. इंजिनद्वारे उत्पन्न होणाऱ्या वेस्ट मटेरियलमध्ये केवळ पाणी असेल. याला हायड्रोजन इंधन म्हणून वापर करता येईल.

हे डंपर ब्रेक्रिंग सिस्टमद्वारे तयार होणाऱ्या कायनेटिक एनर्जीला देखील स्टोर करेल, ज्याद्वारे लिथियम आयन बॅटरी चार्ज होईल.

फ्यूल सेल इलेक्ट्रॉनिक डंपरच्या निर्मितीसाठी अँग्लो अमेरिकन कंपनीने ब्रिटनच्या विलियम्स एडवांस्ड इंजिनिअरिंग कंपनीसोबत भागिदारी केली आहे. लंडन येथील ही कंपनी ई-रेसिंग कारसाठी बॅटरी तयार करते.

फ्यूल सेल इलेक्ट्रिक व्हिलक एक अशी प्रणाली आहे, ज्यात इंधन स्त्रोत म्हणून हायड्रोजन आणि ऑस्किजनचा वापर करून इलेक्ट्रोकेमिकल (विद्युत रासायनिक) प्रक्रियेद्वारे वीज निर्मिती होते. सामान्य बॅटरीप्रमाणेच हायड्रोजन इंधन सेल देखील रासायनिक उर्जाला विद्युत उर्जेमध्ये बदलले जाते. याच कारणामुळे ही प्रणाली अधिक काळ टिकते. याचा वापर आता कारमध्ये होऊ लागला आहे.

Leave a Comment