या विलिनीकरणामुळे रिलायन्स बनणार देशातील सर्वात मोठी मीडिया कपंनी

रिलायन्स इंडस्ट्रीजने आपली मीडिया आणि डिस्ट्रिब्यूशन व्यवसायाचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची कंपनी नेटवर्क 18 मध्ये टिव्ही18, केबल सेवा देणारी डेन आणि हॅथवे या कंपन्यांचे विलीनीकरण होईल.

17 फेब्रुवारी 2020 ला झालेल्या सामूहिक बैठकीत या विलीनीकरणाला मंजूरी देण्यात आली आहे. या विलीनीकरणानंतर रिलायन्स इंडस्ट्री देशातील सर्वात मोठी मीडिया कंपनी झाली आहे. सांगण्यात येत आहे की या विलीनीकरणानंतर नेटवर्क 18 चे वार्षिक उत्पन्न 8 हजार कोटी रुपये होईल.

17 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत टिव्ही18 ब्रॉडकास्ट, हॅथवे केबल, डेन नेटवर्क आणि नेटवर्क 18 चे अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकी नंतर रिलायन्सने सांगितले न्यूज आणि एंटरटेनमेंटच्या या महाविलीनीकरणानंतर देशातील सर्वात मोठ्या केबल डिस्ट्रीब्यूशनला एकाच छताखाली आणल्याने सर्वांची क्षमता वाढेल व याचा फायदा सर्व भागधारकांना होईल. या विलीनीकरणानंतर रिलायन्सची टक्क झी ग्रुप आणि सन टिव्ही नेटवर्कशी होईल.

या विलीनीकरणानंतर टिव्ही18 ब्रॉडकास्टच्या 100 शेअर्सच्या जागी नेटवर्क18 चे 92 शेअर्स मिळतील. हॅथवे शेअर्सच्या 100 शेअर्स जागी नेटवर्क18 चे 78 शेअर्स आणि डेन नेटवर्कच्या 100 शेअर्सच्या जागी 191 शेअर्स मिळतील.

Leave a Comment