रतन टाटांनी शेअर केला देश चालवणाऱ्या लोकांचा व्हिडीओ

उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यातील आशयामुळे सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये देशाला चालवणाऱ्या लोकांची कथा सांगण्यात आली आहे. अखेर देश कोण चालवते ? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हा व्हिडीओ पाहून मिळेल.

या तीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये एक विद्यार्थी पालक, शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांसमोर भाषण देत आहे. यामध्ये तो सांगत आहे की, त्याचे वडील देश चालवतात. तो हे देखील सांगतो की, माझे वडील राजकारणी, पोलीस, डॉक्टर अथवा सैनिक नाहीत, तरी देखील ते देश चालवतात. तो मुलगा पुढे सांगतो की जर त्याचे वडील कामावर गेले नाही तर देश जाग्यावर थांबेल.

https://www.instagram.com/tv/B8suOZxnYyi/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडीओमध्ये मुलाने सफाई काम करणाऱ्या आपल्या वडिलांबद्दल सांगितले आहे. व्हिडीओमध्ये मुलगा सांगत आहे की, त्याचे वडील कचरा, गटर आणि आजारांच्या आत जातो व खूप आजारी पडून बाहेर येतो. कधीकधी वाटते की, माझे वडील आजारासमोर हार पत्करतील.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. टाटांनी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिले की, मुंबई 2.3 कोटी लोकांचे शहर आहे. येथे 50 हजार लोक सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. ते प्रत्येक दिवशी कठिण परिस्थितीमध्ये मुंबईतील कचऱ्याशी सामना करतात. टाटा ट्रस्टने एक ‘मिशन गरीमा’ नावाने अभियान सुरू केले आहे. ज्याद्वारे शहर साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा, स्वच्छता आणि मानवी स्थितीत काम करण्यासाठी मदत केली जाईल.

Leave a Comment