आता बिहाराच्या जनतेशी प्रशांत किशोर यांची ‘बात बिहार की’


पाटना – आता बिहारमध्ये नव्या राजकीय खेळीला राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सुरूवात केल्याचे दिसत असून जनता दल यूनायटेड (जेडीयू) मधुन प्रशांत किशोर उर्फ ‘पीके’ यांची दिल्ली विधानसभा निवडणुकीअगोदर सातत्याने पक्षविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी हकालपट्टी करण्यात आली होती. प्रशांत किशोर या पार्श्वभूमीवर प्रथमच माध्यमांसमोर व्यक्त झाले आहेत.

मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल प्रश्न उपस्थित करणार नाही. त्यांच्याशी माझे केवळ वैचारिक मतभेद आहेत. पण सशक्त नेतृत्व आम्हाला हवे असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. त्याचबरोबर यावेळी प्रशांत किशोर यांनी एक महत्वपूर्ण घोषणा देखील केली, आपण २० फेब्रुवारीपासून ‘बात बिहार की’ हा नवा कार्यक्रम सुरू करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

प्रशांत किशोर ‘बात बिहार की’ बद्दल माहिती देताना म्हणाले, बिहारमधील ८ हजार ८०० पंचायतींमधुन या कार्यक्रमाअंतर्गत अशा एक हजार युवकांची निवड केली जाणार आहे, ज्यांची अशी इच्छा आहे की, पुढील दहा वर्षांमध्ये बिहारचा समावेश देशातील दहा प्रमुख राज्यांमध्ये असावा. पण यावेळी त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर जाण्याच्या विचारात आपण नाही.

प्रशांत किशोर भाजप व जेडीयूच्या युतीवर टीका करताना म्हणाले, युती ही विकासासाठी झालीच पाहीजे असे काही आवश्यक नाही. बिहारचा विकास भाजपसोबतची युती करत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बिहारची जी परिस्थिती २००५ मध्ये होती, अन्य राज्यांच्या तुलनेत बिहारमध्ये तशीच परिस्थिती कायम असल्याचेही प्रशांत किशोर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Comment