या देशात चक्क अशी वेशभूषा करुन साजरा केला जातो हा विशेष उत्सव

जगभरात अशी अनेक ठिकाण आहे, जी आपल्या विचित्र सणांसाठी ओळखली जातात. असाच एक देश म्हणजे मॅक्सिको. मॅक्सिकोमध्ये गेली अनेक वर्षांपासून ‘डे ऑफ द डेड’ नावाच सण साजरा केला जात आहे. हा सण तेथील नागरिक चक्क भूत आणि सांगाड्या सारखे दिसणारे कपडे परिधान करून साजरा करतात.

Image Credited -World Nomads

दोन दिवस चालणारा हा सण दरवर्षी नोव्हेंबरमध्ये साजरा केला जातो. हा सण जवळपास 2000 वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते.

Image Credited – Mexico News Daily

मॅक्सिकोची लोक मानतात की त्यांच्या पुर्वजांची आत्मा एक दिवसासाठी आपल्या कुटुंबासोबत राहण्यास येते. यासाठी हा सण साजरा केला जातो.

Image Credited – people.howstuffworks

या सणाच्या निमित्ताने शहरातून परेड देखील निघते. ज्यात लोक भूत, सांगडे असे विचित्र पोशाख परिधान करून सहभागी होतात. या परेडला कॅटरिना नावाने ओळखले जाते.

Image Credited – Insider

मॅक्सिकोच्या रस्त्यांवर देखील असे मोठमोठे सांगाडे ठेवण्यात येतात. ते पाहताना असे वाटते की जणू एखादी व्यक्तीचे डोके अथवा हात जमिनीमधून बाहेर येत आहे. स्थानिक कलाकार हे कलाकृती दरवर्षी तयार करतात.

Leave a Comment