ही ठरली देशातील पहिली सर्वाधिक सुरक्षित एसयूव्ही

महिंद्रा अँड महिंद्राची सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही महिंद्रा एक्सयूव्ही300 ला देशातील सर्वात सुरक्षित कारचा पुरस्कार (Safer Choice Award) मिळाला आहे.  हा पुरस्कार मिळवणारी महिंद्रा एक्सयूव्ही300 देशातील पहिलीच एसयूव्ही ठरली आहे. ही एकमेव कार आहे, जिने ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळवली आहे.

कंपनीने महिंद्रा एक्सयूव्ही300 ला मागील वर्षी 14 फेब्रुवारीला लाँच केले होते. काही दिवसांपुर्वीच या एसयूव्हीला अडल्ट ऑक्यूपेंट सेफ्टीमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाली होती. कोणत्याही अन्य कारच्या तुलनेत चाइल्ड आणि अडल्ट सेफ्टीमध्ये (लहान मुले आणि प्रौढ सुरक्षा) सर्वाधिक रेटिंग मिळवणारी ही पहिली कार आहे.

महिंद्रा एक्सयूव्ही300 ला अडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 5-स्टार आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 4-स्टार रेटिंग मिळाली होती. टाटा नेक्सॉनला अडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 5-स्टार आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 3-स्टार रेटिंग व टाटा अल्ट्रोझला अडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 5-स्टार आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 3-स्टार रेटिंग मिळाली होती.

जी-एनसीएपी टेस्टिंग दरम्यान कारच्या इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि पेडेस्ट्रेयन प्रोटेक्शनची देखील चाचणी घेण्यात आली होती. या दोन्ही चाचण्यांनी एक्सयूव्ही300 ला पुरस्कार मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

या पुरस्काराची सुरूवात 2018 पासून झाली आहे. हा पुरस्कार केवळ चाइल्ड ऑक्यूपेंट रेटिंगमध्ये 4 स्टार मिळवणाऱ्या कारलाच दिला जातो. सोबतच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल म्हणजेच ईएससी फीचर सर्व व्हेरिएंटमध्ये असणे गरजेचे आहे. सोबतच मॉडेल किमान पादचारीमार्गाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment