ही आहेत सर्वाधिक कसोटी क्रिकेट सामने खेळली गेलेली स्टेडियम

पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना 1844 साली खेळला गेला. मात्र 1877 साली त्याला कसोटी क्रिकेट असे नाव पडले. क्रिकेटची सुरुवात इंग्लंडमधून झाली हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तेथूनच क्रिकेट जगभरात पोहचले. कसोटी क्रिकेटमध्ये शेकडो वर्षात अनेक बदल झाले आहेत. आजही क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटला सर्वाधिक महत्त्व प्राप्त आहे. मात्र सर्वाधिक कसोटी सामने खेळलेल्या मैदानांविषयी माहिती आहे ?

Image Credited – visitbritain

लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड –

क्रिकेट्सची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सर्वाधिक कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 136 वर्षांच्या लॉर्ड्सच्या इतिहासात आतापर्यंत 139 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने पार पडले आहेत. 1884 मध्ये 21-23 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडम्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. लॉर्ड्सवर अखेरचा कसोटी सामना 2019 साली अॅशेस मालिकेदरम्यान 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान पार पडला.

Image Credited – Amarujala

मेलबर्न क्रिकेट ग्राउंड –

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना पार पडला होता. जगातील सर्वोत्तम स्टेडियम पैकी एक असलेल्या मेलबर्नवर 112 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या स्टेडियममध्ये एकावेळी 1 लाखांपेक्षा अधिक प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

Image Credited – NDTV

सिडनी क्रिकेट ग्राउंड –

ऑस्ट्रेलियातीलच सिडनी क्रिकेट ग्राउंड या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. येथे 1882 मध्ये 17 ते 21 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. याच मैदानावर सर डॉन ब्रॅडमन यांनी प्रथम श्रेणी सामन्यात न्यू साउथ वेल्स विरुद्ध नाबाद 452 धावा ठोकल्या होत्या. येथे आतापर्यंत 108 कसोटी सामने खेळले गेले आहेत.

Image Credited – The Telegraph

ओव्हल क्रिकेट ग्राउंड –

या यादीत तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचे ओव्हल क्रिकेट ग्राउंड आहे. येथे आतापर्यंत 102 कसोटी क्रिकेट सामने पार पडले आहेत. सप्टेंबर 1880 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान येथे पहिला कसोटी सामना पार पडला.

Leave a Comment