परवडणाऱ्या किंमतीतला या कंपनीचा स्मार्ट टिव्ही लाँच

इलेक्ट्रिक कंपनी Daiwa ने भारतात आपले दोन नवीन स्मार्ट टिव्ही लाँच केले आहेत. कंपनीच्या दोन्ही स्मार्ट टिव्हीमध्ये क्वॉटम लुमिनिट आणि द बिग वॉल देण्यात आले आहे. दोन्ही टिव्हीमध्ये 1 जीबी रॅम + 8 जीबी स्टोरेज मिळेल.

Daiwa ने लाँच केलेले स्मार्ट टिव्ही पैकी 1 टिव्ही 32 इंच आणि दुसरा टिव्ही 39 इंचचा आहे. 39 इंचाच्या टिव्हीचे मॉडेल ‘D40HDRS’ असून, त्याची किंमत 16,490 रुपये आहे. तर 32 इंचाच्या टिव्हीचे मॉडेल मॉडेल ‘D32S7B’ असून, त्याची किंमत 9,990 रुपये आहे.

दोन्ही टिव्हीसोबत 2 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. यात क्वॉडकोर प्रोसेसरसोबत अँड्राईड ओरिया 8.0 देण्यात आले आहे. टिव्ही स्क्रीनचे रिझॉल्यूशन 1366X768 पिक्सल आहे.

कंपनीचा दावा आहे की यात ए-प्लस ग्रेड पॅनेलचा वापर करण्यात आलेला आहे. लुमिनिटी तंत्रज्ञानाद्वारे तुम्हाला 178 डिग्री वाइड अँगलने पाहण्यास मदत मिळेल. टिव्हीचा रिफ्रेश रेट 60Hz असून, यात सिनेमा मोड देखील मिळेल.

दोन्ही टिव्हीमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली असून, यात 20 वॉट बॉक्स स्पीकर मिळेल. टिव्हीमध्ये बिग वॉल यूआय मिळेल, ज्याद्वारे युजर्स 17 लाखांपेक्षा अधिक तास व्हिडीओ कंटेट पाहू शकतील. याशिवाय या टिव्हीमध्ये हॉटस्टार, झी5, सोनी लिव्ह आणि जिओ सिनेमा सारखे अ‍ॅप्स मिळतील. यात मिराकास्टसोबत 2 यूएसबी आणि 2 एचडीएमआय पोर्ट देण्यात आलेले आहेत.

Leave a Comment