आता चक्क ‘इको फ्रेंडली’ पद्धतीने करता येणार अंत्यसंस्कार

मृत शरीराला जाळल्यानंतर त्याद्वारे होणाऱ्या कार्बनचे उत्सर्जन थांबविण्यासाठी अमेरिकेत इको-फ्रेंडली अंत्यसंस्कार पद्धत विकसित करण्यात आली आहे. यात एका विशेष बॉक्समध्ये मृतदेहाला लाकडाच्या तुकडे आणि झाडांच्या अवशेषांसोबत बंद केले जाते व फिरवले जाते.

या बॉक्समध्ये शरीराचे तापमान 55 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचते व याद्वारे निर्माण झालेल्या जिवाणूंद्वारे शरीर 30 दिवसात नष्ट होते. शेवटी, फक्त काही हाडे आणि माती खत म्हणून शिल्लक राहते.

ट्रायल स्वरूपात हाडांचे अवशेष प्राप्त होत आहे. मात्र व्यावसायिक स्वरूपात सुरू झाल्यावर हे अवशेष देखील प्राप्त होणार नाही. सध्या या प्रक्रियेची चाचणी सहा मृतदेहांवर करण्यात आली.

या प्रक्रियेला व्यावसायिक पद्धतीने फेब्रुवारी 2021 मध्ये अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये सुरू केले जाईल. ही सेवा सुरू झाल्यानंतर अशा प्रकारे मृत शरीरावर अंत्यसंस्कार करण्याची ही पहिलीच सेवा असेल.

या पद्धतीला विकसित करणारी कंपनी रिकम्पोजचे म्हणणे आहे की, ही प्रक्रिया पारंपारिक अंत्यसंस्काराच्या तुलनेत पर्यावरणासाठी अधिक चांगली आहे. पांरपारिक पद्धतीत जवळपास 1 टन कार्बन उत्सर्जित होतो, जो या इको फ्रेंडली पद्धतीमध्ये होत नाही.

Leave a Comment