कोरोना या व्हायरसने मांसाहार करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी जन्म घेतला


नवी दिल्ली – सध्या कोरोना व्हायरसने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून आपल्या नागरिकांना या व्हायरसची झळ बसू नये, यासाठी शास्त्रज्ञ व्हायरसवर अचूक उपचार शोधण्यासाठी अद्याप संशोधन करत असतानाच एक अजबच वक्तव्य अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केले आहे. कोरोना या व्हायरसने मांसाहार करणाऱ्या लोकांना शिक्षा देण्यासाठी जन्म घेतला असल्यामुळे चीनने आता कोरोना व्हायरसची मूर्ती स्थापन करून पुन्हा मासांहार करणार नाही, अशी शपथ घ्यावी, असा अजब सल्ला चक्रपाणी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपींग यांना दिला आहे.

कोरोना हा व्हायरस एक अवतार असून या व्हायरसने प्राणी आणि जीव-जंतुना वाचवण्यासाठी जमिनीवर अवतार घेतला आहे. कोरोनाची मूर्ती उभारून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपींग यांनी कोरोना व्हायरसची माफी मागावी. तसेच पुन्हा मासांहार करणार नाही आणि कोणत्याही निर्दोष जिवांना त्रास देणार नाही, अशी शपथ घ्यावी. त्यानंतरच कोरोना व्हायरसचा प्रकोप कमी होईल, असे चक्रपाणी म्हणाले आहेत.

चक्रपाणी यांनी यापूर्वीदेखील या व्हायरसवर उपचार करण्यासाठी अजब दावा केला होता. कोरोना व्हायरसमुळे ग्रस्त असलेला एखाद्या रुग्णांच्या शरीरावर गाईचा शेण लावला आणि ‘ओम नम: शिवाय’ हा जप केला तर त्याचे प्राण वाचतील, असा दावा स्वामी चक्रपाणी महाराजांनी केला होता.

Leave a Comment