पुण्यात बनवली गेली कोरोना प्रतिबंधात्मक लस


पुणे: आतापर्यंत हजारो लोकांचा चीनमधील वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने बळी घेतले आहेत. जगातील अनेक देश या व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. जगभरातील इतर देशांना हा व्हायरस रोखण्यात अपयश आले असतानाच, कोरोना व्हायरसला रोखणारी लस विकसित करण्यात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने यश मिळवले आहे. ही लस अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीने विकसित करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरावर वैद्यकीय चाचणीसाठी ही लस उपलब्ध असून, या लसीची सहा महिन्यांनतर एखाद्या व्यक्तीवर चाचणी केली जाईल.

कोरोना रोखण्यासाठी एसआयआय आणि कोडाजेनिक्सद्वारे विकसित करण्यात आलेली लस या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी एक सुरक्षाकवच असल्याचा दावा केला जात आहे. प्रचंड रोगप्रतिकारशक्ती ही विकसित होणारी लस निर्माण करते. सहा महिन्यांत ही लस मानवी चाचणीसाठी तयार होईल. ही भारताची पहिली लस असेल, जी एवढ्या वेगाने या स्तरापर्यंत आणण्यात यश प्राप्त झाले असल्याचे एसआयआयचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितले आहे.

या लसीला मानवी चाचणीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरी मिळवावी लागेल. त्यानंतर तिचा वापर कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी करण्यात येईल. मानवी शरीरावर लसीच्या संशोधनासाठी एक वर्ष लागेल. २०२२ च्या सुरुवातीला या लसीची निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे. ही लस विकसित झाल्याने जागतिक स्तरावर फैलावलेल्या साथीच्या रोगाचा सामना करण्यात भारत किती सक्षम आहे हेच यातून दिसत असल्याचे पूनावाला यांनी सांगितले.

Leave a Comment