या अ‍ॅप्सचा वापर करा आणि टायपिंगच्या कटकटीपासून मिळवा मुक्तता

अनेकदा मोठ मोठे लेख, भाषण टाइपिंग करण्यास अधिक वेळ लागतो व कंटाळा देखील येतो. मात्र प्ले स्टोरवर असे अनेक अ‍ॅप्स आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही केवळ बोलून टाइपिंग करू शकता. याशिवाय तुम्ही वॉइस नोट देखील या स्पीच रिकॉग्नीशन अ‍ॅप्सद्वारे तयार करू शकता. अशाच काही अ‍ॅप्सविषयी जाणून घेऊया.

एव्हरनोट –

या अ‍ॅपमध्ये तुम्ही काहीही लक्षात ठेवण्यासाठी रिमाइंडर नोट तयार करू शकता. तुम्ही यामध्ये टेक्सटसोबत डाक्यूमेंट्स, वेबपेज, फोटो आणि ऑडिओ नोट्स देखील बनवू शकतात. तुम्ही केवळ बोलून या अ‍ॅपद्वारे नोट्स बनवू शकता. मात्र यात ऑडिओ रेकॉर्डिंगला शब्दांमध्ये बदलण्याचा पर्याय नाही.

Image Credited – The Next Web

जस्ट प्रेस रेकॉर्ड –

या अ‍ॅपमध्ये तुम्हाला टॅप रेकॉर्डिंग, ट्रांसक्रिप्शन आणि आय क्लाउड डिव्हाईसेसमध्ये सिंकिंग सारखी सुविधा मिळते. यामध्ये तुम्ही रेकॉर्ड केलेल्या आवाजाला ट्रांसक्रिप्ट देखील करण्याची सुविधा मिळेल. ट्रांसक्रिप्शन केल्यानंतर तुम्हाला बदल देखील करता येईल. या अ‍ॅपमध्ये 30 भाषा सपोर्ट करतात.

image Credited – Top Apps Like

स्पीच नोट्स –

स्पीच नोट्स तुम्ही बोलून रेकॉर्ड केलेल्या आवाजाला शब्दांमध्ये बदलण्यासाठी चांगले अ‍ॅप आहे. यामध्ये मोठमोठ्या भाषणांचे लेख सहज तयार करता येतात. हे अ‍ॅप गुगल वॉइस रिकॉग्निशनवर चालते. तुम्ही नोट रेकॉर्ड करत असताना, की-बोर्डच्या माध्यमातून विराम चिन्हे देऊ शकता. गुगल प्ले स्टोरवरून तुम्ही हे अ‍ॅप मोफत डाउनलोड करू शकता.

Image Credited – guzzle

लाईव्ह ट्रांसक्रिब –

व्हिडीओ आणि वॉइस मेमोला शब्दात बदलण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करता येईल. हे अ‍ॅप आर्टिफिशियल इंटेलिजेंटवर चालते. या अ‍ॅपमध्ये जगभरात बोलल्या जाणाऱ्या 80 पेक्षा अधिक भाषा सपोर्ट करतात. एखाद्या फाईलला तुम्ही शब्दात बदलल्यानंतर तुम्ही संपादन देखील करू शकता.

Leave a Comment