मुंबईच्या स्वाती स्नॅक्सच्या वडापावला चविष्ट बर्गरच्या यादीत स्थान


फोटो सौजन्य एनडीटीव्ही
फास्ट फूड मध्ये सर्वाधिक खाल्ला जाणारा प्रकार म्हणजे बर्गर. मिशेलिन शेफ स्टार्स अॅवॉर्ड या नामांकित पुरस्कारासाठी जगभरातील नामवंत शेफनी तयार केलेल्या यादीत मुंबईतील स्वाती स्नॅक्स मधील वडापावला जगभरातील चविष्ट बर्गरच्या यादीत स्थान दिले आहे. हे अॅवॉर्ड मिळविण्याची अनेक शेफमध्ये इर्षा असते आणि त्यासाठी जगभरात सर्वाधिक आवडीने खाल्ले जाणारे चविष्ट पदार्थ जगभरातील शेफ निवडतात. मुंबईच्या या वडापावची शिफारस शेफ रविंद्र भोगल आणि शेफ प्रतिक संधू यांनी केली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात सर्वत्र वडापाव मिळतो पण स्वाती स्नॅक्समधल्या या पदार्थाचे कौतुक किती करावे तितके थोडे. तोंडाला नुसत्या वासाने पाणी सुटेल अश्या स्वादाचा चविष्ट वडा, त्यासोबत लोण्यासारखा मऊसूत पाव आणि डोळ्याचा तळ रिकामा करणारी झणझणीत चटणी हे खास कॉम्बिनेशन आहे.

या यादीत सिडनीच्या बर्गरचेन प्रोजेक्ट मधील बर्गर, मेलबर्नच्या बचर्स डायनरमधील बीफ पेटी , सिडनीच्या बटरचेन मधील बर्गर, फ्राईड चिकनचे ओजी चिकन सँडविच, मेलबर्नच्या मॅरीस रेस्तराँमधील वेज चीज बर्गर, चीन हॉंगकॉंगचा क्लासिक बर्गर, डेन्मार्क कोपनहेगन येथील शाकाहारी ग्रीन बर्गर, लंडनच्या डायमंड एसडब्ल्यू मधील बर्गर, आणि अमेरीकेंतील शिकागोच्या ओ शेवाल, बर्गर जोइंट अश्या अनेक ठिकाणाचे पदार्थ समाविष्ट आहेत. यात मांसाहारी आणि शाकाहारी अश्या दोन्ही पदार्थांचा समावेश आहे.

Leave a Comment