बिल गेट्स यांची सुपरकुल खरेदी, इलेक्ट्रिक सुपरकार


फोटो सौजन्य इकॉनॉमिक टाईम्स
जगातील श्रीमंत व्यक्ती खरेदी करतात तेव्हा त्यांच्या शॉपिंगबद्दल एकंदरीत सगळ्यांना कुतूहल असते. जगातील दोन नंबरचे श्रीमंत व्यक्ती, मायक्रोसोफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी नुकतेच एक महागडे याट खरेदी केल्याचे तुम्ही वाचले असेल. पण बिल गेट्सना त्यापेक्षाही आनंद दिलाय तो त्यांच्या नव्या खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक कारने. युट्यूबवर मुलाखत देताना बिल यांनी त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार खरेदी केल्याचे सांगून ही कार सुपरकुल असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पोर्शेची टायकन ही सुपर कार खरेदी केली आहे.

बिल गेट्स नेहमीच जागतिक हवामान बदलाबद्दल जागरूक असतात आणि प्रदुषण कमी करण्यासाठी काय काय उपाय योजले जाऊ शकतात त्याविषयी चर्चा करतात. त्या हेतूनेच त्यांनी इलेक्ट्रिक कार खरेदी केली असून त्यांची ही पहिलीच इलेक्ट्रिक कार असल्याचे सांगितले आहे. गेट्स याच्या ताफ्यात अनेक कार्स आहेत.

गेट्स यांनी खरेदी केलेल्या या पहिल्या इलेक्ट्रिक कारची किंमत १.८५ लाख डॉलर्स म्हणजे १.३ कोटी रुपये असून ती ० ते १०० किमीचा वेग २.६ सेकंदात घेते. फुल चार्ज मध्ये ही कार ४५० किमीचे अंतर कापते. इलेक्ट्रिक कारचे प्रदुषण कमी करण्यासाठीचे महत्व सांगताना बिल या कार्सचे दोषही सांगतात. त्याच्या मध्ये दीर्घ प्रवासात चार्जिग हा मोठा प्रश्न आहे. तसेच त्याच्या किमती अधिक आहेत, विमा रक्कम अधिक आहे. अर्थात या कार्सचा मेंटेनंस कमी आहे हेही ते निदर्शनास आणून देतात.

Leave a Comment