जगातली पहिली हायपरलूप भारतात धावण्याची शक्यता


फोटो सौजन्य कर्टीटेल्स
जगातील पहिली हायपरलूप भारतात धावण्याची शक्यता वाढली असून हायपरलूप बांधणाऱ्या व्हर्जिन ग्रुप अधिकाऱ्यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी याची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यांनी मुंबई दिल्ली दरम्यान १३०० किमी मार्गावर ताशी १२०० किलोमीटर वेगाने जाणारी हायपरलूप सुरु करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे असे खात्रीलायक वृत्त आहे. या संदर्भात कंपनीने महाराष्ट्र सरकारशी पूर्वीपासून बोलणी सुरु केली होती त्यावेळी या हायपरलूपचा प्रस्ताव मुंबई पुणे या मार्गासाठी होता. त्याला भाजप सरकारने हिरवा कंदील दिला होता मात्र महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प रद्द केला होता.

इकॉनॉमीक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार व्हर्जिन ग्रुपचे प्रतिनिधी सध्या भारतात असून दिल्ली मुंबई हायपरलूप गुंतवणुकीसाठी अन्य स्टेक होल्डर्सची चर्चा करत आहेत. गेल्या आठवड्यात रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुलेट ट्रेन प्रमाणेच वाहतुकीचे अन्य प्रोजेक्ट सुरु करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी काही गुंतवणूकदारांसोबत चर्चा सुरु असल्याचे संकेत दिले होते. अर्थात जगात अजून कुठेही हायपरलूप सेवा सुरु झालेली नाही. त्यामुळे दिल्ली मुंबई मार्गावर हायपरलूप सेवा सुरु झाली तर ती जगातील पहिली सेवा असेल.

Leave a Comment