आफ्रिका, द.अमेरिकेपुढे कोरोनाची शरणागती


चीन मधून फैलाव झालेल्या जीवघेण्या करोना विषाणूमुळे जगभरातील अनेक देशात हाहाकार माजला असून दररोज हजारो लोकांना नवीन लागण झाल्याच्या बातम्या झळकत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात आणीबाणी जाहीर केली असली तरी काही देशात मात्र या विषाणूचा प्रसार झालेला नाही असे दिसून आले आहे. त्यामुळे संशोधन आणि वैज्ञानिक थोडे बुचकळ्यात पडले आहेत.

करोनाचा प्रसार झाल्याला आता दीड महिना उलटला आहे आणि अजूनही ही साथ आटोक्यात आलेली नाहीच पण त्याचा फैलाव अधिक वेगाने होत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय संस्था जॉन हॉपकिनच्या साईटनुसार संपूर्ण आफ्रिका तसेच ब्राझील सह द.अमेरिकी देशात या विषाणूचा फैलाव झालेला नाही. या देशात चीनहून परत आलेले अनेक लोक आहेत पण तरीही करोनाचे या देशात अस्तित्व नाही. चीन बाहेर भारतासह शेजारी देश, अमेरिका, युरोप, द.आशिया, रशियात या विषाणूचे संक्रमण झाले आहे.

मिडिया रिपोर्टनुसार असा एक अंदाज वर्तविला जात आहे की आफ्रिका आणि द. अमेरिकेत या विषाणूचा फैलाव न होण्यामागे तेथील उष्ण हवामान हे कारण असू शकते. या देशात आशियाई देशांच्या तुलनेत तापमान १० ते १५ डिग्रीने जास्त असते. यामुळे इतक्या उष्ण हवामानात हा विषाणू कदाचित तग धरू शकत नसावा व त्यामुळे या देशात या विषाणूचा फैलाव होऊ शकला नसावा

Leave a Comment