जगातील एकमेव शहर जे दोन देशांमध्ये आहे विभागलेले

भूमध्य सागरातील देश सायप्रस गेली 45 वर्षांपासून 2 देशांमध्ये विभागलेला आहे. या देशाची राजधानी निकोसिया देखील तुर्की आणि ग्रीस यांच्यामधील युद्धाचे शिकार ठरली. 1974 मध्ये तुर्कीने सायप्रसवर हल्ला करून त्याच्या 40 टक्के भागावर कब्जा केला. युद्ध समाप्त झाल्यानंतर देखील हा देश 2 भागांमध्ये विभागलेला आहे. सायप्रसमध्ये यूनानी आणि मुळ तुर्की लोकांची संख्या समान आहे.

बर्लिनची भिंत पाडल्यानंतर निकोसिया हे जगातील एकमेव असे शहर आहे, जे दोन देशांमध्ये विभागलेले आहे. 1974 मध्ये युद्ध समाप्त झाल्यानंतर तुर्की आणि ग्रीसचा कब्जा असणाऱ्या भागात संयुक्त राष्ट्राने 180 किमीचा लांब रस्ता बांधला. याला ग्रीन लाईन देखील म्हटले जाते.

Image Credited – Matador Network

या फाळणीमुळे सायप्रसची 25 टक्के लोकसंख्या बेघर झाली होती. तुर्कीचा कब्जा असणाऱ्या भागात राहणाऱ्या दीड लाख युनानी लोकांना बाहेर काढण्यात आले होते. याच प्रकारचे यूनानच्या ताब्यात असलेल्या 50 हजार तुर्की लोकांना बाहेर काढण्यात आले होते. निकोसियाच्या या भागांमध्ये संयुक्त राष्ट्राचे सैन्य तैनात असते.

2003 नंतर या भागातील भूसुरंग काढण्याचे काम सुरू झाले. जवळपास 27 हजार भूसुरंग काढल्यानंतर येथे शेती करण्याची परवानगी देण्यात आली.

Image Credited – Matador Network

या ठिकाणी हजारो वर्षांपासूनची ऑलिव्हची झाडे देखील आहेत. या झाडांपासून निघणाऱ्या तेलांचा व्यापार करतात. या तेलाचा व्यापार करणाऱ्या मारिया आणि तिच्या भागीदाराला 2016 ते 2019 दरम्यान अनेक पुरस्कार देखील मिळाले आहे.

Image Credited – Matador Network

संयुक्त राष्ट्राचे सैनिक गाड्या आणि हेलिकॉप्टरद्वारे दिवसातून दोनदा या भागात पेट्रोलिंग करतात. अनेक जणांनी या बफर झोनमध्ये शेती करण्यास सुरूवात केली आहे.

या बफर झोनपासून 10 किमी अंतरावर मारियाच्या काकांनी एक शिक्षा केंद्र देखील सुरू केले आहे. येथे बिझनेस मॅनेजमेंटपासून ते हवामान बदलापर्यंत सर्व काही शिकवले जाते.

Leave a Comment