या रेल्वेमध्ये देवासाठी आरक्षित सीट, सतत वाजणार मंत्र

नुकत्याच उद्घाटन झालेल्या महाकाल एक्सप्रेस रेल्वेमध्ये भगवान शंकरासाठी एक सीट खास आरक्षित ठेवण्यात आली आहे. ही एक्सप्रेस उद्घाटनानंतर पहिल्यांदाच कानपूर सेंट्रल स्टेशनवर आली, त्यावेळी त्यात ओम नमः शिवाय मंत्राची धून वाजत होती. रेल्वेचा कोच बी-5 मध्ये अपर सीटवर महादेवाचे एक छोटे मंदिर देखील बनविण्यात आले आहे. येथे पुजा करून नारळ फोडून स्वागत करण्यात आले.

रविवारी पंतप्रधान मोदींनी दोन ज्योतिर्लिंगांना जोडण्यासाठी काशी-महाकाल एक्सप्रेसचे उद्घाटन केले. भगवान शंकराचे तीन ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर, महाकालेश्वर आणि काशी विश्वनाथला जोडणारी काशी महाकाल एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस वारासणी ते इंदौर दरम्यान धावेल. या रेल्वमध्ये 12 डब्बे आहेत. सर्व डब्बे एसी थ्री टिअर आहेत. आयआरसीटीसीकडून केटेरिंग सेवा दिली जाईल. रेल्वेमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गणवेश कोड केसरी असून, याचे तिकीट ऑनलाईन मिळेल.

Image Credited – livemint

याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या एसी-3 श्रेणीच्या सर्व कोचमध्ये सतत ऊं नमः शिवाय मंत्र वाजत असतो. या मंत्रा व्यतरिक्त भगवान शंकराची अन्य भजन देखील वाजत असतात. प्रवाशांच्या स्वागतासाठी भगवे-पिवळे वस्त्र परिधान करून पुरूष रेल्वेत होस्ट म्हणून असतील.

काशी महाकाल एक्सप्रेसच्या बी-5 कोचमधील 64 नंबरची सीट देवासाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. एखाद्या देवासाठी सीट आरक्षित ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. सीटवर एक लहानसे मंदिर देखील बनविण्यात आले आहे.

Image Credited – Amarujala

या रेल्वेत सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे देखील आहेत. लक्ष ठेवण्यासाठी कोच अटेंडेटच्या सीटवरती एलसीडी डिस्प्ले लावण्यात आलेला आहे. काही अडचण असल्यास कोच अटेंडेट त्वरित मदतीसाठी पोहचेल. मात्र ट्रेन एस्कॉर्टमध्ये आयआरसीटीसीचे स्वतःचे एस्कॉर्ट असतील. रेल्वेमध्ये पुढील स्टेशनबद्दल माहिती देण्यासाठी गेटच्या वरती डिस्प्ले देण्यात आलेले आहेत.

Leave a Comment